Waki Dam : अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड, वाकी धरण भरले

Dam Overflow : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत आहे. तालुक्यातील पिंपळगाव खांड आणि वाकी धरण भरले आहे.
Waki Dam
Waki DamAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत आहे. तालुक्यातील पिंपळगाव खांड आणि वाकी धरण भरले आहे. पिंपळगाव खांड धरण भरल्याने मुळा धरणाकडे पाणी येऊ लागले आहे.

बारी, वारंघुशी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने वाकी धरण प्रकल्पही भरला असल्याने कृष्णवंती नदीला पूर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अन्य भागांतही अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत. मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मॉन्सून सक्रिय झाल्याने अकोले तालुक्यातील आंबित धरणानंतर मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण गुरुवारी (ता. १९) पहाटे भरले.

पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो होऊन मुळा नदीचा पाण्याचा प्रवाह मुळा धरणाच्या दिशेने झेपावला आहे. सुरुवातीला आंबित धारण त्यानंतर सीना धरण ओव्हर फ्लो झाले होते. आता त्यानंतर पिंपळगाव खांड व वाकी घरण ओव्हर फ्लो झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चार धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.

Waki Dam
Pune Water Stock : पुणे जिल्ह्यातील धरणांत एकूण ४५.८८ टक्के पाणीसाठा

मुळा नदीच्या उगमावर आंबीत येथे असणारे १९३ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबीत धरण २७ मेला ओव्हर फ्लो झाले. जिल्ह्यातील हे पहिले धरण भरले होते यानंतर आता पिंपळगाव खांड हे दुसरे तर वाकी हे तिसरे धरण भरले आहे. मॉन्सूनच्या दमदार पावसामुळे अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगा आता ओल्या चिंब झाल्या आहेत. ओढे-नाले सक्रिय झाल्याने मुळा नदीचा प्रवाह वाढला. पिंपळगाव खांड धरणात मोठी आवक झाल्याने ते भरले. बारी, वांरघुशी भागातील पावसाने आंबीत धरण भरले.

अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. चोवीस तासांत भंडारदरा धरणात जवळपास पाऊण टीएमसी जमा झाले. शुक्रवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंत चोवीस तासांत घाटघरला १४३ मिलिमीटर, रतनवाडीला १५८ मिलिमीटर, पांजरे येथे १२६ मिलिमीटर, भंडारदरा येथे १४० मिलिमीटर, निळवंडे येथे ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोतुळजवळ मुळा नदीतून ६ हजार ९५१ क्युसेक वेगाने पाणी मुळा धरणाकडे येत होते.

Waki Dam
Ujani Dam Water Stock: ‘उजनी’ची पाणीपातळी ५० टक्क्यांकडे

जिल्ह्यातील अन्य भागांतही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. पारनेर, अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, राहाता, राहुरी, कोपरगाव अन्य तालुक्यांतील बहुतांश भागात पाऊस झाला. सततच्या पावसाने काही भागांत वाफसा नसल्याने पेरण्यांमध्ये अडथळे येत आहेत.

पाण्याची मोठी आवक

भंडारदरा, मुळा धरणात पाण्याची आवक चांगली होत असून पुणे जिल्ह्यातील पावसामुळे भीमा नदीतून दौंड पुलाजवळ गुरुवारी (ता. २०) सकाळी नऊ वाजता ६३ हजार ४४६ क्युसेकने उजनीकडे पाणी जात होते. घोड नदीतून चार हजार तर गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून २२ हजार ३४५ क्युसेकने विसर्ग सुरू होता असे अहिल्यानगर अपत्ती व्यवस्थापन विभागातून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com