Crop Damage : लोहा-कंधारमधील नुकसानग्रस्त अद्याप वाऱ्यावर

Crop Loss Compensation : खरीप हंगाम २०२३ मध्ये कंधार व लोहा तालुक्यातील सोयाबीन पक्वतेपूर्वीच पिवळे पडून वाळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Nanded News : खरीप हंगाम २०२३ मध्ये कंधार व लोहा तालुक्यातील सोयाबीन पक्वतेपूर्वीच पिवळे पडून वाळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत शासनाच्या निर्देशानुसार महसूल, कृषी आणि मदत व पुनर्वसन विभागाने संयुक्तपणे केलेल्या

पंचनाम्यानुसार दोन लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ६८६ हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठवून ८० कोटींची मागणी केली. याबाबत विधिमंडळातही प्रश्‍न उपस्थित झाला. परंतु युती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा अद्याप निधी मंजूर झाला नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

Crop Damage
Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये कंधार, लोहा व इतर तीन तालुक्यात सोयाबीनवर पिवळा मोझॅक हा विषाणुजन्य रोग आणि खोडकुज व मुळकुज याबुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनला बाधा झाली होती. परिणामी उत्पादनात चाळीस ते ८० टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज कृषी विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याबाबत शासनाने पंचनामे करून नुकसानीचे क्षेत्र करण्याचे निर्देश दिले होते.

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानातील बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगाचा प्रादुर्भाव नांदेड जिल्ह्यांत दिसून आल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडून वाळले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार संयुक्त यंत्रणांनी केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील ४७८ गावातील सोयाबीन पिकाला या रोगाची बाधा झाली.

यात नांदेडमधील कंधार, लोहा, मुदखेड, नायगाव व नांदेड या तालुक्यातील दोन लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ६८६ हेक्टर क्षेत्राला बाधा पोचल्याचा अहवाल शासनाला पाठविला आहे. यासाठी प्रशासनाने ८० कोटींच्या मदतीची मागणीही शासनाकडे केली. परंतु मदत व पुनर्वसन विभागाने मात्र या भरपाईला मंजूरी दिली नाही.

Crop Damage
Crop Damage : पीक नुकसानीबाबत साडेचार लाखांवर पूर्वसूचना प्राप्त

याबाबत आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडली. परंतु याकडे सरकारने जाणीवपूर्वक दर्लक्ष्य केल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे. यांचा फटका युती सरकारला आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता बळावली आहे.

अतिवृष्टीच्या भरपाईतूनही वगळले

जिल्ह्यात जून-जुलैमध्ये २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सहा लाख १७ हजार ९११ शेतकऱ्यांना भरपाईसाठी ४२० कोटी ४६ लाख मंजूर झाले. ही भरपाई सध्या शेतकऱ्यांना मिळाली. परंतु कंधार व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचे इतर १४ तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच अतिवृष्टीत नुकसान होवूनही कंधार व लोह्यातील शेतकऱ्यांना या भरपाईपासून वंचित राहावे, लागले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com