Rain Update : तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

Monsoon Rain : राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. कोकणात पावसाचा प्रभाव कमी झाला असला तरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. कोकणात पावसाचा प्रभाव कमी झाला असला तरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. रत्नागिरीतील बुरोंडी येथे सर्वाधिक १०८ मिलिमीटर पाऊस पडला. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहे.

कोकणात मागील दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर आता जोर कमी झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास सर्वदूर पाऊस पडला. दाभोळ मंडलात ७२.८ मिलिमीटर तर, चिपळूण, खेर्डी, रामपूर, कळकवणे, आंजर्ले, शिर्शी, दाभीळ, धामणंद, गुहागर मंडलांत जोरदार पाऊस पडला.

या पावसामुळे या भागातील भात खाचरे भरून वाहू लागले आहेत. ठाण्यातील नांदगाव, अंगाव, पडघा, रायगडमधील खोपोली, तळवली, पाटपन्हाळे, सौंदळ मंडलांत पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे कोकणातील धरणांतील पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

Weather Update
Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १९५ पैकी १०६ मंडलांत पावसाची हजेरी

खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. नंदुरबारमधील सारंगखेडा मंडलात ६०.५ मिलिमीटर,तर शहादा ५३.८ मिलिमीटर, म्हसवड, तळोदा, चुलवड, खापर खोंडामळी, रनाळा मंडलांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. धुळेतील नगाव मंडलात ६२.८ मिलिमीटर पाऊस पडला.

तर धुळे खेड, कुसुंबा मंडलात ५४.५, खलाणे ५७.८ मिलिमीटर पाऊस पडला असून आर्वी, सोनगीर, मुकटी, जळगावमधील पारोळा मंडलात ९१ मिलिमीटर तर, पिंप्राळा ५४.० मिलिमीटर पाऊस पडला. नाशिकमधील नायगाव मंडलात ७२.०, तर वाडीवऱ्हे, धारगाव मंडलात जोरदार, सोलापुरातील माढा ९१.५ मिलिमीटर, आगळगाव ६४.३, सुर्डी ६८.३, खांडवी ४५.३, म्हैसगाव ५८, लऊळ ५३.५ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते.

Weather Update
Rain Update : कोकणात जोर ओसरला

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर मंडलात ५४.८ मिलिमीटर पाऊस पडला. तर चिखलठाणा, करमाड, जानेफळ, सिल्लोड मंडलात पावसाचा जोरदार सरी कोसळल्या. जालन्यातील वरूडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला. बीडमधील पिंपळनेर मंडलात ५० मिलिमीटर तर पाली, नांदूरघाट मंडलात मध्यम लातूरमधील रेनापूरमध्ये ४९.८ मिलिमीटर तर मातोळा, बेलकुंड, उजानी भागात मध्यम पाऊस पडला.

परभणीमधील बनवास, पिथेशिवानी, रावराजूर येथे मध्यम पाऊस पडला. नांदेडमधील जाहूर येथे ७९.० मिलिमीटर, तर येवती, सिरजखोड, जरीकोट, कारखेली, धर्माबाद, घोलेगाव, सिंधी जोरदार पाऊस पडला.

विदर्भातील यवतमाळमधील मोहगाव, घाटंजी, भंडाऱ्यामधील मोहाडी, तुमसर, गडचिरोलीतील अहेरी, कोर्ची, गोंदियातील मोरगाव अर्जुनी, नागपूरमधील मौदा येथे ४९.५ मिलिमीटर, तर उर्वरित भागात हलका पाऊस पडला. वर्ध्यातील आष्टी येथे ४०.६ मिलिमीटर, तर हिंगणघाट येथे हलका सरी बरसल्या. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळू लागला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ चांगली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com