Crop Damage : खानदेशात साडेचार हजार हेक्टरवरील पिकांची हानी

Unseasonal Rain Crop Damage : जळगाव जिल्ह्यात १३०० हेक्टर, धुळ्यात सुमारे २८० हेक्टर व नंदुरबारात सुमारे २४०० हेक्टरवरील पपई, मका, केळी, कांदा व इतर रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Jalgaon News : खानदेशात कापूस पिकाला पंचनाम्यांतून वगळले. यामुळे पिकहानी कमी दिसत असून, सुमारे साडेचार हजार हेक्टरवरील पिके वादळ, गारपीट व पावसात आडवी झाली आहेत. जळगाव जिल्ह्यात १३०० हेक्टर, धुळ्यात सुमारे २८० हेक्टर व नंदुरबारात सुमारे २४०० हेक्टरवरील पपई, मका, केळी, कांदा व इतर रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.

नंदुरबारात शहादा, तळोदा तालुक्यात पपई व केळीची हानी अधिकची झाली आहे. जळगावात जामनेर, यावल, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोल भागात पिकांची हानी झाली आहे. पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे. खानदेशात २१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विविध भागात वादळी पाऊस, गारपीट झाली आहे. यात वेचणीवर आलेल्या कापसाचेही नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage : ‘मॉन्सूनोत्तर’ने बीडमध्ये २८६ हेक्टर पिकांचे नुकसान

नुकसान अधिक झाल्याने अनेकांच्या कापासाचा दर्जा घसरला आहे. वेचणीसाठी मजूर वेळेत न मिळाल्याने पिकांची हानी वाढली. परंतु कापूस पिकासंबंधी कुठलीही नुकसान भरपाई शासन किंवा विमा कंपनीकडून मिळणार नसल्याचे शासकीय यंत्रणांनी म्हटले आहे. कापूस पीक चार महिन्यांचे किंवा खरिपातील पीक आहे.

त्याचे नुकसान ३० टक्क्यांवर झालेले नाही. तसेच विमा संरक्षणही या पिकास चार महिनेच होते. यामुळे कापूस उत्पादक भरपाईपासून वंचित राहतील, अशी स्थिती आहे. पंचनाम्यांचा अंतिम अहवाल अद्याप शासनाला सादर झालेला नाही. सतत पाऊस व नुकसान सुरूच होते. यामुळे नुकसानीचे क्षेत्रही वाढले. पंचनामे सुरूच होते. यामुळे अंतिम अहवाल तयार झालेला नसल्याची माहिती आहे.

Crop Damage
Cotton Crop Damage : कापसाच्या वाती, माती मिश्रित कापसाला फुटले कोंब

पपई बागा आडव्या

केळी, पपईचे सर्वाधिक नुकसान नंदुरबार जिल्ह्यात झाले आहे. शहादा, तळोदा भागात वादळ व बेमोसमी पाऊस अधिक झाला आहे. २५ महसूल मंडळांत अतिवृष्टीही नंदुरबारात झाली होती. तसेच गारपीट, वादळाचा तीन वेळेस फटका बसला. यामुळे या भागात नुकसान सुरूच होते. पपई बागा आडव्या झाल्याने हंगाम हातचा गेला आहे.

त्यातून कुठलीही काढणी होवू शकणार नाही. तसेच केळी बागांचेही शहादा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात यावल, जामनेरात नुकसान झाले आहे. यामुळे केळी, पपई उत्पादाकांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई, दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कारण पपई, केळी बागा आडव्या झाल्याने त्यातून आता कुठलेही उत्पादन येणार नाही. क्षेत्र रिकामे करण्यासाठी आणखी मजुरी खर्च येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com