Heat Wave : शनिवारपर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता

Weather Update : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र-मुंबई यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी २२ ते २५ मे दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Heat Wave
Heat Wave Agrowon

Nashik News : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र-मुंबई यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी २२ ते २५ मे दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला असून उकाडा जाणवत आहे. ही उष्णतेची लाट आणखी दोन दिवस असण्याची शक्यता आहे. सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत आला आहे.

Heat Wave
Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

जिल्ह्यात २० मे पासून तापमानात वाढ दिसून आली. निफाड कृषी संशोधन केंद्रावर सोमवारी (ता. २०) तापमान ३९.८ अंशावर होते. आता हंगामात ४० अंश सेल्सिअसखाली असलेले तापमान ४० अंशांवर गेले आहे. चालू हंगामात बुधवारी (ता. २२) ४२ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. गेल्या काही वर्षांत हे कमाल तापमान नोंदविले गेले.

वाढत्या उष्णतेमुळे मानवी जीवनासह शेती व पशुंवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळी परिस्थिती तर दुसरीकडे तापमान वाढ यामुळे उन्हाळी पिके अडचणीत सापडली आहेत. उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला व फळबागांना शक्यतो सायंकाळी वारंवार व हलके ओलीत करावे व पिकामध्ये अच्छादनाचा वापर करावा तसेच जनावरांचे उष्णतेपासून संरक्षणासाठी गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी संचलित ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्या कृषी हवामान विभाग यांच्याकडून देण्यात आला आहे.

Heat Wave
Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी

उभ्या पिकांना हलके व वारंवार सिंचन द्या

पिके जस-जसे मोठी/वाढतात त्याप्रमाणे पाण्याची आवश्यकता असते ते पूर्ण करण्याकरिता सिंचनाची वारंवारता वाढवा

मातीतील ओलावा वाचवण्यासाठी पिकाचे अवशेष, पेंढापॉलिथीन/गवतांचा आच्छादन म्हणून वापर करावा

फक्त संध्याकाळी किंवा अगदी सकाळच्या वेळी (ऊन येण्यापूर्वी) पाणी द्यावे

भाग उष्ण लहर प्रवण क्षेत्र असेल तर शिंपडणे पद्धतीचे (स्प्रिंकलर) सिंचनाचा वापर करावा

पशुपालकांनी काळजी घ्यावी

प्राण्यांना सावलीत ठेवा आणि पिण्यास भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या. त्यांच्याकडून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान काम करून घेऊ नये

पेंढ्यांच्या (गवत) मदतीने शेडचे छप्पर झाकून ठेवावे, तापमान कमी करण्यासाठी त्यास पांढरा रंग द्यावा किंवा शेण-चिखलसह थर द्यावा

शेडमध्ये पंखे, वॉटर स्प्रे आणि फॉगर्स वापरावे

तीव्र उष्णते दरम्यान, पाणी फवारणी करावी आणि गोठ्याजवळच थंड पाण्यासाठी सोय करावी. त्यांना हिरवे गवत, प्रथिनेयुक्त, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य द्यावे

जनावरांना सकाळी किंवा सायंकाळी चरावयास न्यावे

कुक्कुटपालन शेडमध्ये पड‌द्यांचा वापर करावा आणि व्यवस्थित हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com