Fertilizer Company : खत उत्पादक कंपनी प्रतिनिधींची पालकमंत्र्यांकडून कानउघाडणी

Fertilizer shortage : अगोदर पुरेशा पावसाअभावी यंदाचा काही तालुक्यांतील खरीप वाया जातो की काय, अशी शेतकऱ्यांमध्ये धाकधूक असताना नाशिकमध्ये खताच्या टंचाईची नवी समस्या उभी ठाकली.
Dada bhuse
Dada bhuseAgrowon

Nashik news : अगोदर पुरेशा पावसाअभावी यंदाचा काही तालुक्यांतील खरीप वाया जातो की काय, अशी शेतकऱ्यांमध्ये धाकधूक असताना खताच्या टंचाईची नवी समस्या उभी ठाकली. जिल्ह्यात खताच्या टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभाग आणि खत कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात खताच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील खतांचा तुटवडा थांबविण्याची ग्वाही देत श्री. भुसे यांनी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची पुरवठ्यातील फरकाबद्दल कानउघाडणी केली.

Dada bhuse
Fertilizer Shortage : अमरावती जिल्हाभरात खतांचा तुटवडा

जिल्ह्यासाठी कृषी विभागातर्फे यंदाच्या खरिपाकरिता ऑगस्टअखेर दोन लाख ६० हजार टन खताची मागणी करण्यात आली होती. कृषी आयुक्तालयाने दोन लाख २२ हजारांहून अधिक टन अनुदानित खतांचा साठा मंजूर केला. प्रत्यक्षात ऑगस्टअखेर कंपन्यांनी एक लाख ९६ हजार ११८ टन खताचा पुरवठा करणे अपेक्षित होते. कंपन्यांनी ६८.५७ टक्के म्हणजे एक लाख ३४ हजार ४८८ टन खत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. ६१ हजार ६३० टन कमी खताची उपलब्धता झाली. त्यात ६० हजार १७ टन युरिया जिल्ह्यासाठी कमी मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खतटंचाईला सामोरे जावे लागत असून, खतांच्या लिंकेजच्या तक्रारींना तोंड फुटले आहे.

Dada bhuse
खरिपात सोयाबीन बियाण्यात ३२ हजार टनांची तुट 

चंबळ फर्टिलायझर ॲण्ड केमिकल, राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टिलायझर्स, इंडियन पोटॅश लिमिटेड, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, इफको, साउथर्न पेट्रोकेमिकल को-ऑपरेशन, नॅशनल फर्टिलाझर ॲनण्ड केमिकल, कृभको, गुजरात स्टेट फर्टिलायझर, पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड या कंपन्यांकडून कमी प्रमाणात खतांसह युरिया उपलब्ध करून दिल्याची माहिती बैठकीत चर्चेत आली. खताच्या पुरवठ्याची कोंडी आठ दिवसांत सोडविण्याची सूचना श्री. भुसे यांनी केली. अनेक कंपन्यांनी साठ्यानुसार नियमित अनुदानित खतांचा पुरवठा जिल्ह्याला केला नसल्याची बाब भुसे यांच्या निदर्शनास आली.  

कृषी विभागाने कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे सतत पाठपुरावा करूनही जिल्ह्यात खतांचे रेक उपलब्ध होत नाहीत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत कंपन्यांना लेखी पत्र दिल्याची बाब बैठकीत चर्चेत आली. श्री. भुसे म्हणाले, की जिल्ह्यात जवळपास सर्व कंपन्यांनी मंजूर साठ्यानुसार अनुदानित खतांचा पुरवठा न केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब खत कंपन्यांच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यात तत्काळ मंजूर साठ्याप्रमाणे मागील पुरवठ्यातील तुटीसह शिल्लक खतपुरवठा करावा, युरिया खताचा प्राधान्याने तत्काळ पुरवठा करण्याबाबतचे आदेश संबंधित पुरवठादार कंपन्यांना देण्यात आले आहेत. पुण्याच्या कृषी आयुक्तांना समन्वय साधून खतटंचाईची समस्या आठवडाभरात सोडविण्याचे निर्देश दिले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com