Mushroom Benefits : आरोग्यदायी अळिंबी

Health Benefits Of Mushroom : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. अतिरिक्त ऊर्जा शक्तीचा स्रोत लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबीचे सेवन केले पाहिजे.
Mushroom
MushroomAgrowon
Published on
Updated on

विवेकानंद तिमेवार, शिवानी लोकेवार

ओल्या अळिंबीमध्ये २.७८ टक्के प्रथिने, ०.६५ टक्का स्निग्ध पदार्थ, ४.४ टक्के पिष्टमय पदार्थ, ०.९७ टक्का खनिजे, १.०८ टक्का तंतुमय पदार्थ आणि ९० टक्के पाणी असते. याचबरोबरीने पालाश, स्फुरद, कॅल्शिअम, लोह, सोडिअम इत्यादी घटक असतात.

आरोग्यदायी फायदे

  • अळिंबीतील प्रथिनांमध्ये शरीरास पोषक आणि आवश्यक अमिनो आम्लांचा समावेश आहे. ही भाजीपाल्यातील प्रथिनांपेक्षा उच्च प्रतीची व पचनास हलकी असतात. अमिनो आम्लापैकी ट्रिप्टोफॅन, लायसिन मोठ्या प्रमाणात असतात.

  • जीवनसत्त्व ब-१, ब-२ व क यांचे प्रमाणही इतर अन्न घटकांपेक्षा जास्त आहे. ही जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. उदा. अशक्तपणापासून बचाव, गर्भवती माता आणि तिच्या बाळासाठी फायदेशीर, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असतात.

  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. अतिरिक्त ऊर्जा शक्तीचा स्रोत लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबीचे सेवन केले पाहिजे.

Mushroom
Mushroom Business : अळिंबीची उत्पादन ते पुरवठा साखळी
  • पौष्टिक व स्वास्थवर्धक असते. यातून अतिरिक्त ऊर्जा मिळते, त्यामुळे लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो.

  • विविध औषधी गुणधर्मांमुळे प्रामुख्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, दमा फुफ्फुसाचे रोग, विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य रोग प्रतिबंधास अगर उपचारास विशेष उपयोग होतो.

  • अळिंबीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिसॅकराइड चिरतरुण ठेवण्यास मदत करते. यातील सेलेनियम घटक शरीरातील मुक्त कणांपासून बचाव करून कॅन्सरचा धोका कमी करते.

  • अळिंबीमध्ये जीवनसत्त्व ड मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. पोटॅशिअम आणि सोडिअम क्षारांचे प्रमाण संतुलित असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते.

  • अळिंबी सेवन इन्शुलिन निर्मितीसाठी मदत करते. तंतुमय पदार्थ पाचक शक्ती वाढवितात, त्यामुळे मधुमेहासाठी उत्तम आहार आहे.

  • प्रथिने, जीवनसत्वे ,खनिज व कार्बोदके बाल्यावस्था ते वृद्धावस्थेपर्यंत सर्वांना कुपोषणापासून वाचवते.

धिंगरी अळिंबीच्या जाती

प्लुरोटस साजोर काजू :

  • करडा रंग, तापमान आणि आद्रता फरकास प्रतिकारक्षम जात.

  • आवश्यक तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस, आर्द्रता ८० ते ९० टक्के.

  • शिंपल्याच्या आकाराची, आकर्षक व चविष्ट.

Mushroom
Mushroom Cultivation : ग्रामीण युवकांनी अळिंबी लागवडीकडे वळावे

प्लुरोटस इओस :

  • गुलाबी रंग, गुच्छ स्वरूपात येते.

  • २० ते ५० अंश सेल्सिअस तापमान, ६५ ते ९० टक्के आर्द्रतेत चांगली वाढ.

  • थोडी शिजवल्यानंतर रबरासारखी वाटते.

प्लुरोटस फ्लोरीडा :

  • रंग पांढराशुभ्र, काढणीस उशीर झाला तर मऊ पडून काळसर होते.

  • गुच्छ पद्धतीने उगवते. आकाराने मोठी असते.

प्लुरोटस फ्लॅबीलॅट्‍स :

  • आकार पंख्यासारखा असतो.

  • फळांचा रंग अगोदर गुलाबी आणि नंतर पांढरा होतो.

  • अळिंबी मऊ असून देठ अखूड असतो.

प्लुरोटस ऑस्ट्रीॲट्‍स :

  • अंकुरित अवस्थेत निळा रंग, त्यानंतर हा रंग फिक्कट होतो.

  • अळिंबी गुच्छ पद्धतीने बाहेर पडते.

  • चवीला चांगली असल्याने बाजारात मागणी.

मूल्यवर्धित पदार्थ

  • प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पूरक अन्न म्हणून वापर होतो. ताजी किंवा वाळलेल्या अळिंबीवर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार करता येतात.

  • वाळलेल्या अळिंबीची पावडर तयार करून सूप, गोळ्या, पापड, वड्या तयार करता येतात.

  • अळिंबीपासून लोणचे, शेवया, सांडगे, चिप्स तसेच भाजी, पुलाव, भजी, समोसा, वडे, सलाड, कबाब, आम्लेट, करी, सॉस, पिझ्झा असे पदार्थ तयार करता येतात.

विवेकानंद तिमेवार,

७५०७१५०१३८(अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी, जि. बीड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com