Bael Fruit: आरोग्यदायी, औषधी बेल फळ

Bael Benefits: बेल हे भारतीय उपखंडातील औषधी फळ आहे. बेलाचे झाड आणि फळ हे दोन्ही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे. बेलाचे पान, फळ, मूळ, साल औषधी स्वरूपात उपयोगात येतात.
Bael Fruit
Bael FruitAgrowon
Published on
Updated on

दिव्या भगत, डॉ. जी. एम. माचेवाड

Medicinal Fruit : बेल हे भारतीय उपखंडातील औषधी फळ आहे. बेलाचे झाड आणि फळ हे दोन्ही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे. बेलाचे पान, फळ, मूळ, साल औषधी स्वरूपात उपयोगात येतात.

या वृक्षाचा उगम भारत, श्रीलंका आणि दक्षिण आशिया विभागातील आहे. या झाडाची उंची १० ते १५ मीटरपर्यंत असते. पाने त्रिपर्णी, सुगंधी असतात. फुले पांढरट-हिरव्या रंगाची असून त्यांना गंध असतो.

फळ गोलसर, कडक कवच असलेले, आत गोडसर गर असलेले आहे. हे झाड अत्यंत कठीण हवामान सहन करू शकते. कोरड्या प्रदेशात, दुष्काळी भागातसुद्धा हे झाड सहज जगते.

फळाचे वैशिष्ट्य

बेल फळाचे कवच अत्यंत कठीण असते. फळ फोडण्यासाठी हातोडी किंवा कठीण वस्तूंची आवश्यकता लागते. आत चिकटसर, पिवळसर किंवा तपकिरी गर असतो. गरात लहान, सपाट व केसाळ बिया असतात.

ताजे बेलाचे फळ ताजे खाता येते. फळाचा वापर सरबत बनवण्यासाठी केला जातो. सुकवलेले बेल फळ चूर्ण स्वरूपात वापरले जाते, जे आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते.

Bael Fruit
Healthy Fruit : आरोग्यदायी फळ : शिंगाडा

उद्योग, आर्थिक महत्त्व

फळाचा उपयोग औषधनिर्मितीच्या बरोबरीने खाद्यपदार्थ, पेय, सौंदर्यप्रसाधने आणि आयुर्वेदिक औषधनिर्मिती उद्योगात केला जातो.

सरबत : उन्हाळ्यामध्ये सरबतास चांगली मागणी.

बेल मुरंबा व चटणी : पारंपरिक पाककृतीत वापर.

औषधी उद्योग : अनेक कंपन्या कॅप्सूल्स, पावडर तयार करतात.

बेल रोपे, वृक्षारोपण : सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमांत वापर.

पर्यावरणीय महत्त्व

बेल वृक्ष जलसंधारण, जमिनीची धूप रोखण्यासाठी उपयुक्त आहे. त्याच्या खोल मुळांमुळे माती धरून ठेवली जाते. शिवाय, याचे फळ पक्षी, कीटकांसाठी अन्नाचा स्रोत आहे.

बेल फळाचा वापर करताना

कच्चे बेल फळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

मधुमेही रुग्णांनी बेल सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.

फळ व पाने योग्य प्रकारे ओळखूनच वापरावी.

Bael Fruit
Healthy Spinach : आरोग्यदायी पालकाचे फायदे

आयुर्वेदिक उपयोग

पचन सुधारक : फळाचे सरबत किंवा चूर्ण पचनासाठी वापरले जाते. हे गॅस, अपचन, आम्लपित्त यावर प्रभावी आहे.

अतिसार व जुलाबावर उपाय : फळामधील अ‍ॅस्ट्रिंजंट गुणधर्म पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची गळती कमी करण्यास उपयुक्त.

बद्धकोष्ठता निवारण : तयार फळ तंतूयुक्त असल्याने पचनमार्ग स्वच्छ करते.

कफ विकारांवर उपयोगी : काढा खोकला, सर्दी यावर दिला जातो.

मधुमेहावर नियंत्रण : कोवळ्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतो.

ताप, अशक्तपणा, जंत नियंत्रण : बेलाचे पंचांग (मुळे, साल, पाने, फळ, फुले) विविध प्रकारे वापरले जाते.

Bael Fruit
Healthy Pulses : मोड आलेली आरोग्यदायी कडधान्ये

वैद्यकीय फायदे

अँटी-मायक्रोबियल : फळातील तत्त्वे जिवाणू व बुरशीविरोधी कार्य करतात.

अँटी-ऑक्सिडंट : मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करत असल्यामुळे वृद्धत्व प्रक्रिया धीमी होते.

हृदयासाठी उपयुक्त : रक्तदाब व कोलेस्टरॉल नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त.

कर्करोग प्रतिबंधक : संशोधनानुसार बेल फळातील संयुगे कर्करोगजन्य पेशींची वाढ थांबवू शकतात.

पौष्टिक घटक (१०० ग्रॅम)

पोषणतत्त्व प्रमाण कार्य

ऊर्जा (कॅलरी) १३०-१४० कॅलरी ऊर्जा प्रदान

कर्बोदके ३१ ग्रॅम शरीरासाठी ऊर्जा

प्रथिने १.८ ग्रॅम स्नायूंची वाढ

तंतू २.९ ग्रॅम पचन सुधारणा

चरबी ०.३ ग्रॅम ऊर्जेची साठवण

कॅल्शिअम ८५ मिग्रॅ हाडे मजबूत करणे

फॉस्फरस ५० मिग्रॅ पेशी क्रिया

पोटॅशिअम ६०० मिग्रॅ रक्तदाब नियंत्रण

जीवनसत्त्व सी ८-१० मिग्रॅ रोगप्रतिकारशक्ती वाढवणे

बी-कॉम्प्लेक्स कमी प्रमाणात मज्जासंस्थेसाठी उपयुक्त

- दिव्या भगत, ९२८४५६२४२४ , (अन्न आणि पोषण विभाग, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय,परभणी )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com