Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Makhana Production : योग्य पचनासाठी, आपल्या शरीराला तंतुमय घटकांची आवश्यकता असते. मखनामध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्थेला योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करते. मखनामध्ये मॅग्नेशियमचे उच्च प्रमाण असते, जे रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन पातळी सुधारते.
Makhana
Makhana Agrowon
Published on
Updated on

कृष्णा काळे, डॉ.सुभाष पावडे

बिहारमधील मिथिलांचल प्रदेश, मधुबनी येथे मखनाची लागवड केली जाते. पारंपरिक पद्धतीने मखनाचे उत्पादन घेतले जाते. देशभरात मखना बिया आणि मखना फ्लेक्सला चांगली मागणी आहे. मखनाचा विस्तार पाकिस्तान, कॅनडा, चीन, मलेशिया आणि बांगलादेश यांसारख्या देशांमध्ये झाला आहे.

आपल्या देशात मखनाची लागवड प्रामुख्याने मधुबनीपुरती मर्यादित आहे. देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत मखना बियाणे आणि फ्लेक्सच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे, भारत सरकारतर्फे कंपन्यांना मखनाचे ब्रँड आणि पॅकेज करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. सरकार मधुबनी आणि दरभंगा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मखनाच्या लागवडीद्वारे चांगले जीवनमान मिळविण्यासाठी मदत करत आहे.

आरोग्यदायी फायदे

आहारात मखनाच्या बियांचा समावेश केल्याने मॅक्रोमोलेक्युल आणि तंतुमय घटक वजन कमी करण्यासाठी मदत करतात. प्रथिने, विशेषतः भूक नियमनामध्ये मदत करते. काही अभ्यासानुसार, भरपूर तंतुमय घटकांचे सेवन हे पोटाची चरबी आणि जमा झालेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

योग्य पचनासाठी, आपल्या शरीराला तंतुमय घटकांची आवश्यकता असते. मखनामध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्थेला योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा कठीण मल यांसारख्या समस्या असतील तर तुमच्या रोजच्या आहारात मखनाचा समावेश करावा.

Makhana
बिहारमधल्या 'मिथिला मखाना'ला जिआय टॅग

यामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात. हा घटक अँटिऑक्सिडेंट आहेत. हे मुक्त रॅडिकल्सचा सामना करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करते. त्याचा आरोग्याला फायदा होतो. मखनाचे सेवन केल्याने सुरकुत्या, बारीक रेषा आणि केस अकाली पांढरे होणे यांसारख्या वृद्धत्वाची लक्षणे टाळता येतात.

मखनामध्ये अल्कलॉइड्स, सॅपोनिन्स आणि गॅलिक ॲसिड सारखे फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे तुमच्या शरीराला विविध रोगांपासून वाचवू शकतात. कमी मॅग्नेशिअम पातळीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. मखनामध्ये मॅग्नेशियमचे उच्च प्रमाण असते, जे रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन पातळी सुधारते, ज्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. तुमच्या शरीराच्या मॅग्नेशिअमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दररोज मूठभर मखना खाल्ला पाहिजे.

शरीराला हायड्रेटेड राहण्यास आणि त्यातील पाण्याचे प्रमाण राखण्यास मदत करते. यामुळे शरीरातील स्राव ओलसर राहण्यास मदत होते. हे शुक्राणूंची मात्रा आणि गुणवत्ता दोन्ही वाढवते. मखना हे प्रजनन व्यवस्थेसाठीही फायदेशीर असल्याचे मानले जाते.

फ्लेव्होनॉइड्स, जे वनस्पतींमध्ये दुय्यम चयापचय आहेत, जळजळ कमी करून आणि हृदयविकाराचा धोका कमी करून मानवी आरोग्यास फायदेशीर ठरते.

पोटॅशिअमचे प्रमाण जास्त आणि सोडिअमचे प्रमाण कमी असल्याने ते उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. मखना रक्तदाब नियंत्रणात मदत करते. सिस्टोलिक रक्तदाब पातळी राखण्यासाठी सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे.

Makhana
मखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्की

अभ्यासानुसार, मखना रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते. मखना अर्क रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारू शकते. प्राण्यांमधील या संशोधनात मखनाच्या अर्काचा वापर जास्त प्रमाणात केला गेला. परिणामी, ठरावीक प्रमाणात सेवन केल्यावर मखनाचा मानवांमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होऊ शकतो हे निर्धारित करण्यासाठी अतिरिक्त संशोधन आवश्यक आहे.

मखणामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. कॅल्शिअम हाडे आणि दातासाठी आवश्यक आहे. तुमच्या आहारात कॅल्शिअमची कमतरता तुमची हाडे नाजूक आणि कमकुवत बनवू शकते, ज्यामुळे फ्रॅक्चर आणि संधिवात होण्याची शक्यता वाढते. शरीराच्या कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करतात. संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिस असलेल्या रुग्णांना त्यांची हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

यामध्ये तुरट गुणधर्म जास्त असतात आणि ते किडणीच्या समस्या टाळण्यास मदत करतात. कमी सोडियम आहार नियंत्रित रक्तदाब आणि कमी ताण या सर्वांमुळे किडनीचे आरोग्य चांगले राहते. मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. वारंवार लघवी होणे, लघवीवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता आणि मूत्रपिंड निकामी होणे यासारख्या समस्यांना तोंड देण्यास मदत करू शकते.

- कृष्णा काळे, ८८०५९६८५३६ (अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com