Healthy Cucumber : काकडीचे आरोग्यदायी फायदे

Article by Priti Bhosale and Dr Vijaya Pawar : काकडी ही सर्वांत थंड, उत्साहवर्धक आहे. काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. ते घातक पदार्थ काढून टाकून शरीराला चांगले ठेवण्यास आणि पोषण करण्यास मदत करते.
Cucumber
CucumberAgrowon

प्रीती भोसले, डॉ. विजया पवार

Health Benefits of Cucumber : काकडी ही सर्वांत थंड, उत्साहवर्धक आहे. काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. ते घातक पदार्थ काढून टाकून शरीराला चांगले ठेवण्यास आणि पोषण करण्यास मदत करते. काकडीतील पाणी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

काकडीमध्ये क्युक्युरबिटॅसिन बी हा एक नैसर्गिक पदार्थ आहे. हा प्रामुख्याने विविध मानवी कर्करोगाच्या पेशींमध्ये ॲपोप्टोसिस कर्करोगविरोधी क्षमता वाढविण्यास उपयुक्त आहे. काकडीची साल आहारातील तंतुमय घटकांचा चांगला स्रोत आहे, जो बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतो. पोटातील विषारी घटक काढून टाकून कोलन कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत करतो.

Cucumber
Summer Cucumber : किनारी प्रदेशातील उन्हाळी काकडी लागवडीमधील समस्या अन् उपाययोजना

काकडीमध्ये तंतुमय घटक, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम चांगल्या प्रकारे आढळते. हे पोषक घटक रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. पोटॅशिअम आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढविणारे गुणधर्मदेखील रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. त्वचेसाठी काकडी फायदेशीर आहे. काकडीचा रस त्वचेवर लावल्याने फायदा होतो. त्वचा मऊ आणि चमकदार बनते. सुरकुत्या आणि बारीक रेषाही कमी होतात. काकडीतील सिलिका केस आणि नखांसाठी फायदेशीर आहे. काकडी खाल्ल्याने बद्धकोष्ठता टाळता येते.

Cucumber
Cucumber Seed : काकडीच्या सदोष बियाण्याची विक्री

काकडी खाण्याचे प्रमाण :

काकडीचे सेवन केल्याने काही लोकांमध्ये पोट फुगणे यांसारख्या पचन समस्या उद्‍भवू शकतात.

किडनी समस्या असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात काकडीचे सेवन करू नये, कारण यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि पोटॅशिअम वाढू शकते, जे त्यांच्यासाठी हानिकारक आहे.

काकडीची ॲलर्जी असलेल्यांच्या अंगावर पित्ताच्या गाठी, सूज आणि श्‍वास घेण्यात अडचण यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

पोषण मूल्य (१०० ग्रॅम)

कॅलरी ३० किलो कॅलरीज

पाणी १९० ग्रॅम

प्रथिने १.३ ग्रॅम

तंतुमय घटक १ ग्रॅम

कर्बोदके ७.२६ ग्रॅम

चरबी ०.२२ ग्रॅम

कॅल्शिअम ३२ मिग्रॅ

पोटॅशिअम २९४ मिग्रॅ

फॉस्फरस ४८ मिग्रॅ

मॅग्नेशिअम २६ मिग्रॅ

जीवनसत्त्व क ५.६ मिग्रॅ

फोलेट १४ मायक्रोग्रॅम

बीटा कॅरोटीन ९० मायक्रोग्रॅम

प्रीती भोसले, ८७६७९२०३८४

(अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com