इलायची केळीचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या, उच्च आर्थिक गटातील लोकांची इलायची केळीला पसंती वाढली आहे.
Elaichi Banana
Elaichi BananaAgrowon
Published on
Updated on

केळी उत्‍पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतातील एकूण केळीच्या उत्‍पादनापैकी सुमारे ५० टक्‍के उत्‍पादन महाराष्‍ट्रात होते. केळीचे निम्‍म्‍यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्‍हयात आहे. म्‍हणून जळगांव जिल्‍ह्याला केळीचे आगार मानले जाते. (Jalgaon Banana) याशिवाय मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा आणि कळमनुरी हे तालुके केळी उत्पादनात अग्रेसर आहेत. कारण, या परिसरातील जमीन काळी, कसदार व चांगल्या प्रतीची आहे. परंतू कोरोना काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या बागांवर नांगर फिरवला. केळीच्या बागा (Banana Orchards) कमी झाल्या असल्याने आणि केळीला मागणीसुद्धा वाढली आहे त्यामुळे केळीच्या दरात वाढ झाली आहे.

केळी हे पौष्टिक फळ असून ते वर्षभर उपलब्ध असते त्यामुळे केळीला गरिबांचे फळ म्हणतात. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे शरिराला लगेच ऊर्जा देते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते. देशात आणि राज्यात अनेक प्रकारच्या केळी बघायला मिळतात. परंतु तुम्ही कधी इलायची केळी खाल्ली आहे का? इलायची केळीची क्रेझ सध्या खूप वाढली आहे. विशेषतः आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या, उच्च आर्थिक गटातील लोकांची इलायची केळीला पसंती वाढली आहे. ही केळी आता बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. इलायची केळी नेहमीच्या केळीपेक्षा आकाराने लहान असते आणि सालही बऱ्यापैकी पातळ असते. चव सामान्य केळीपेक्षा गोड असते. महाराष्ट्रात या केळीला इलायची, कर्नाटकमध्ये येलक्कई तर बिहारमध्ये चीनीया म्हणतात.

Elaichi Banana
राज्यात Banana Market rate मध्ये मोठी वाढ|Banana Bajarbhav|Agrowon

इलायची केळीचे आरोग्यदायी फायदे
केळीमध्ये कर्बोदके, अ जीवनसत्व, लोह आणि सफरचंदापेक्षा तीनपट जास्त फॉस्फरसचे प्रमाण असते. पोटॅशियम, फायबर आणि नैसर्गीक साखर केळीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.
ह्रदयाचे ठोके नियमित राहण्यासाठी, कमी रक्तदाब, शरिरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी इलायची केळी फायदेशीर आहे.
जास्त प्रमाणात पोटॅशिअम आणि कमी प्रमाणात सोडीअम असल्यामुळे इलायची केळी उच्च रक्तदाब, ह्रदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे.
मजबूत हाडे आणि दातांसाठी कॅल्शियम आणि पोटॅशियम ही दोन महत्वाची खनिजे आवश्यक असतात. इलायची केळीमधून ही दोन्ही खनिजे मुबलक प्रमाणात मिळतात. पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्त प्रवाह नियंत्रित राहतो. कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे वयानुसार हाडे, दात कमकुवत होणे तसेच हाडांचा ठिसूळपणा इ. समस्यांवर फायदेशीर आहे.

Elaichi Banana
केळी लागवडीत मोठी घट

स्टार्च आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लूकोज या नैसर्गिक साखरेमुळे फळाचा गोडवा वाढतो. पेक्टिन आणि विद्राव्य फायबरचे मध्यम प्रमाण असते, जे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
इलायची केळीमध्ये फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. फॉलिक ऑसिडचा वापर गर्भधारणेच्या काळात आवश्यक असलेले अतिरिक्त रक्त तयार करण्यासाठी केला जातो. केळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह देखील असते, जे अशक्तपणा टाळण्यास मदत करते.
इलायची केळीचे आरोग्यासाठी एवढे सगळे फायदे असल्यामुळे तिची लोकप्रियात दिवसेंदिवस वाढत आहे.

Elaichi Banana
हवामान बदलामुळे केळी नाहीशी होणार का ?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com