Sugarcane Variety : उसाची नवीन जात : फुले ऊस १३००७

Sugarcane Variety : अखिल भारतीय ऊस समन्वित योजनेच्या द्वीपकल्पीय विभागातून महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांसाठी फुले ऊस १३००७ ही जात प्रसारित करण्यात आली.
Sugarcane Variety
Sugarcane VarietyAgrowon
Published on
Updated on

डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. सुरेश उबाळे

Flower Sugarcane 13007 : मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून २०२३ मध्ये अखिल भारतीय ऊस समन्वित योजनेच्या द्वीपकल्पीय विभागातून महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांसाठी फुले ऊस १३००७ ही जात प्रसारित करण्यात आली. या जातीची निर्मिती फुले २६५ आणि कोएम ०२५४ या जातीच्या संकरातून करण्यात आली आहे.

फुले ऊस १३००७ ही जात ऊस व साखर उत्पादनात को ८६०३२ या जातीपेक्षा सरस असून सुरू, पूर्व आणि आडसाली या तिन्हीही हंगामासाठी उपयुक्त आहे. या जातीचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता. याशिवाय क्षारयुक्त जमिनीत या जातीची चांगली उगवण होत असून, उत्पादनक्षमता देखील चांगली आहे.

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता तपासणीचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये एप्रिल, मे, जून या काळात देण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाळ्या थांबविण्यात आल्या होत्या. त्यानंतर नियमित पाणी देऊन निष्कर्ष तपासले असता नियमित पाण्यापेक्षा उत्पादनात केवळ १६ टक्के आणि साखर उत्पादनात १३.९८ टक्के घट आली.

भारतीय ऊस संशोधन संस्थेकडून नवीन जातीची शिफारस महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत लागवडीसाठी करण्यात आली आहे.

Sugarcane Variety
Sugarcane Variety : फुले ऊस १५०१२ : अधिक साखर उतारा देणारी ऊस जात

राज्यस्तरीय उत्पादन :

राज्यस्तरीय चाचण्यांमध्ये सुरू हंगामात हेक्टरी १२९ टन, पूर्वहंगामात १३६ टन, आडसाली १४७ टन आणि खोडवा उत्पादन हेक्टरी १२१ टन मिळाले.

साखर उत्पादन अनुक्रमे हेक्टरी १८.४४, १९.४०, २०.५३ आणि १७.१० टन मिळाले. हे ऊस उत्पादन तुलनात्मक जात को ८६०३२ पेक्षा सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडव्यामध्ये अनुक्रमे ८.७२, १३.००, ९.१४ आणि ११.२२ टक्के आणि साखर उत्पादन ९.०५, १०.९८, ६.१० आणि १०.२५ टक्के अधिक मिळाले.

फुले ऊस १३००७ या जातीचे व्यापारी शर्करा प्रमाण सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडवा अनुक्रमे १४.२२, १४.१९, १३.९५ आणि १४.०२ टक्के मिळाले.

द्वीपकल्पीय विभागात उत्पादन :

अंतिम चाचणीमध्ये तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ आणि महाराष्ट्रात राज्यातील १२ ठिकाणी फुले ऊस १३००७ या जातीचे उत्पादन को ८६०३२, कोसी ६७१, कोएसएनके ०५१०३ या प्रचलित जातींपेक्षा अनुक्रमे ११.२२, २९.७० आणि १९.७८ टक्के अधिक मिळाले.

खोडव्याचे ऊस आणि साखर उत्पादन को ८६०३२ पेक्षा अनुक्रमे १०.८७ टक्के आणि १२ टक्के अधिक मिळाले. ही जात १२ ठिकाणी देशात साखर आणि ऊस उत्पादनात पहिला आली आहे.

Sugarcane Variety
Sugarcane Variety : 15012 या उसाच्या वाणाला तुरा आणि पांगशा फुटल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

द्वीपकल्पीय विभागात उत्पादन वाढ घटकांचा अभ्यास :

उसाचा सरासरी व्यास, उसाची कांड्यापर्यंत सरासरी उंची, उसाची हेक्टरी संख्या आणि उसाचे सरासरी वजन याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये फुले ऊस १३००७ या जातीच्या उसाचा सरासरी व्यास २.८० सेंमी मिळाला. हा व्यास को ८६०३२ पेक्षा अधिक दिसून आला आहे.

उसाची सरासरी उंची (सेंमी) मध्ये फुले ऊस १३००७ या जातीची उंची २६६ सेंमी मिळाली. ही उंची को ८६०३२ पेक्षा अधिक आहे. एका उसाच्या सरासरी वजनामध्ये फुले ऊस १३००७ जातीचे वजन १.५३ किलो मिळाले. हे वजन को ८६०३२ पेक्षा जास्त आढळून आले.

वैशिष्ट्ये :

कांड्याचा रंग हिरवा, पाचट निघाल्यानंतर रंग पिवळसर हिरवा, उंच वाढणारी, शंक्वाकृती नागमोडी कांडी, मध्यम आकाराचा अंडाकृती डोळा, डोळ्यापुढे खाच नाही.

मध्यम रुंदीची सरळ वाढणारी गर्द हिरवी पाने, पानावर कूस नाही, पाचट सहज निघते.

मध्यम जाडीचा दशी न पडणारा ऊस, संख्या जास्त, चांगला खोडवा, लालकुज, काणी, मर, पिवळा पानांच्या रोगास प्रतिकारक्षम, तांबेरा, तपकिरी ठिपके, पोक्का बोइंग रोगांना प्रतिकारक.

खोड कीड, कांडी कीड व लोकरी मावा किडींना कमी बळी पडणारी जात.

तुरा उशीरा व कमी प्रमाणात येतो.

०२१६९-२६५३३३ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता.फलटण, जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com