Arvind Kejriwal Attack : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाहनावर दगडफेक; भाजपवर आरोप

Arvind Kejriwal Delhi : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडफेक झाल्याचा आरोप आपकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर आपकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले.
Arvind Kejriwal Attack
Arvind Kejriwal Attackagrowon
Published on
Updated on

Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जोर वाढताना दिसून येत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पक्षात आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शनिवारी (ता.१८) दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडफेक झाल्याचा आरोप आपकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर आपकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले.

आम आदमी पक्षाने त्यांच्या अधिकृत 'एक्स'वरून हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला, "भाजप पराभवाला सामोरे जाण्यास घाबरत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला!" भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर विटा, दगडफेक केली. प्रचार करू नये म्हणून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला. भाजपवाल्यांनो, केजरीवालजी तुमच्या भ्याड हल्ल्याला घाबरणार नाहीत, दिल्लीचे लोक तुम्हाला योग्य उत्तर देतील. अशी टीका करण्यात आली.

Arvind Kejriwal Attack
Arvind Kejriwal : केजरीवालांचे मुखवटे

भाजप कार्यकर्त्याचा पाय मोडला!

आपने केलेल्या हल्ल्याच्या आरोपावर, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार परवेश वर्मा म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांची गाडी भाजप महिला कार्यकर्त्याला चिरडत पुढे गेली आहे. त्या महिलेचा पाय तुटला आहे. तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही रुग्णालयातही गेलो होतो. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार परवेश वर्मा यांच्या विरोधात आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

भाडेकरूंनाही वीज आणि पाणी मोफत देणार

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी (ता.१८) पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. दिल्लीतील भाडेकरूंना मोफत वीज आणि पाणी पुरवठ्याचा लाभ मिळत नाही. निवडणुकीनंतर आमचे सरकार आले की, आम्ही अशी योजना आणू, ज्यामुळे भाडेकरूंना मोफत वीज आणि पाणी मिळेल, असे केजरीवाल यांनी जाहीर केले.

माहितीपटावर पोलिसांची कारवाई

आम आदमी पक्षाने तयार केलेल्या अनब्रेकेबल या माहितीपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली पोलिसांनी बंदी घातली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. भाजपने अनब्रेकेबल डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन थांबवले आहे, असा आरोप त्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com