Rabi Crop Harvesting : खानदेश शेतकऱ्यांची लगबग ; हरभरा मळणी आणि दादर ज्वारी कापणी जोमात

Jowar Harvesting : खानदेशात हरभरा कापणी, मळणी, दादर ज्वारीची कापणी व अन्य शेतीकामांना वेग आला आहे.
Chana Harvesting
Chana Harvesting Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात हरभरा कापणी, मळणी, दादर ज्वारीची कापणी व अन्य शेतीकामांना वेग आला आहे. पपई, केळी व अन्य पिकांच्या लागवडीची तयारी सुरू असून, पूर्वमशागत व अन्य कामे सुरू आहेत.

मळणीसाठी भा़डेतत्त्वावर ट्रॅक्टर वेळेत उपलब्ध होत नसल्याने कामांना विलंबदेखील होत आहे. अनेक शेतकऱ्यांना रात्री-मध्यरात्री ही कामे करून घ्यावी लागत आहेत. ज्वारी, मका, कांदा, गहू, बाजरी, केळी आदी पिके खानदेशात आहेत. यात मका पक्व होत आहे. केळीची लागवड आता बारमाही सुरू असते.

Chana Harvesting
Chana Harvesting : अकोल्यात हरभरा पीक काढणीला येऊ लागला वेग

पपई लागवडही सध्या सुरू आहे. काही जण पपई, केळी लागवडीसाठी शेतात मशागत करून घेत आहेत. रब्बी हंगाम हाती आल्याने पुढे खरीप हंगामाची वेळ येणार आहे. यंदा पाऊस चांगला होईल, असेही भाकीत केले जात असल्याने शेतकरी रब्बीचा हंगाम आवरून खरिपासाठी क्षेत्र रिकामे करीत आहेत.

हरभरा कापणी, केळी, पपई रोपांची लागवड आदी कामे शेतकरी शेतीकामे उरकून घेत आहेत. पूर्वी बैलजोडीने पूर्वमशागत केली जात होती. परंतु अलीकडे यंत्रणेचा उपयोग मशागतीसाठी वाढला असून, अपवादानेच बैलजोडीने मशागत शिवारात सुरू असल्याचे दिसत आहे.

Chana Harvesting
Chana Harvesting : हरभरा काढणीच्या कामाला आला वेग

शेत तापू देण्यावर भर

अनेक शेतकऱ्यांनी यंदा गुलाबी बोंड अळीची समस्या रोखण्यासाठी डिसेंबरमध्येच कापसाचे पीक काढले. हे क्षेत्र रिकामे करून पऱ्हाटी जाळली. त्यात मागील महिन्यात खोल नांगरणी करून घेतली आहे.

नांगरणी करून क्षेत्र तापू देण्यावर अनेकांनी भर दिला आहे. कारण शेत तापल्याने जमीन सुपीकतेस बळ मिळते. तसेच गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र मोडण्यासही मदत होईल, असे शेतकरी मानतात. या क्षेत्रात पपई, केळीची लागवड कृत्रीम जलसाठाधारक करतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com