Wheat Harvesting : साताऱ्यात रब्बी पिकांची काढणी सुरू

सध्याही ढगाळ वातावरण असल्याने पिके पदरात पाडण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
Wheat Harvesting
Wheat HarvestingAgrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यातील झालेला वादळी पाऊस (stormy rain) व सध्या होत असलेले ढगाळ वातावरण यामुळे रब्बी ज्वारी, गहू पिकांचे (Wheat Crop) नुकसान होणार आहे. पावसामुळे नुकसान होईल या भीतीने पिके पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात ९० टक्के पिकांची पेरणी झाली आहे. पिकांच्या अवस्थाही चांगली असल्याने शेतकऱ्यांना जास्तीच्या उत्पादनाची आशा निर्माण झाली होती. मात्र गेल्या चार ते पाच दिवसापासून वातावरण झालेला बदल शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरू लागला आहे.

Wheat Harvesting
Wheat Market : नवीन गहू बाजारात येताच कोसळले भाव

जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. सध्याही ढगाळ वातावरण असल्याने पिके पदरात पाडण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. वादळी पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांस फटका बसला आहे.

पंचमान्याची कामे सुरू झाली असून दोन ते तीन दिवसात नुकसानीची आकडे समजणार आहेत. गेल्या दोन दिवसापासून सकाळचे धुके पडत असल्याने ज्वारीवर चिकटा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पहिल्या टप्प्यात पेरण्या झालेल्या रब्बी ज्वारीचा काढणी व खुंडणीची कामे सुरू झाली आहेत. तसेच काढलेली ज्वारी वाळवण्याची कामे केली जात आहे. पावसामुळे कडबा भिजू नये यासाठी लगेच गंजी लावतात किंवा कडबा अडोसे ठेवला जात आहे.

गहू पिकांची काढणी वेग आला आहे. गहू काढणी लवकर व्हावी यासाठी मोठ्या हार्वेस्टरचा वापर केला जात आहे. यामुळे गव्हाची काढणी कमी वेळेत होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com