Nashik Hailstorm: नाशिकला गारपिटीचा तडाखा; १२०० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त!

Crop Damage Issue: नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, नाशिक, दिंडोरी, सिन्नर तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले. कांदा, डाळिंब, द्राक्ष, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik News: नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस व काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, डाळिंब, भाजीपाला व द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बुधवारी (ता.२) जिल्ह्यात जवळपास ३० गावांमध्ये १३०० हेक्टर क्षेत्रावर सुमारे २ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कांदा पिकाचे नुकसान झाले, तर सटाणा तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.

प्रामुख्याने सटाणा, कळवण, नाशिक व दिंडोरी तालुक्यांत नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालावरून समोर आले आहे. तर सिन्नर तालुक्यातही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी कळवले. सायंकाळी वादळी वाऱ्यासह बरसलेला पाऊस, तर काही भागात झालेली गारपीट रब्बी हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढवणारी ठरली आहे. सटाणा तालुका सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : खानदेशात तुरळक पाऊस ; आणखी काही दिवस शक्यता असल्याने शेतकऱ्यांना धसका

सटाणा, जायखेडा, वीरगाव, डांगसौंदाणे, ताहराबाद, किकवारी या महसूल मंडलांमध्ये २.५ मिमीवर पाऊस झाला असून ११६५ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान आहे. तालुक्यातील औदाणे, कौतिकपाडे, मुंजवाड, साल्हेर, मुल्हेर, ताहाराबाद, बिजोटे, आखतवाडे, निताणे, पारनेर, जायखेडा, नांदीन, दरेगाव, तांदूळवाडी, करंजाड, पिंगळवाडे आदीसह मोसम आरम परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर बिजोटे येथे वादळी वारासह गारा पडल्या. शेतकऱ्यांचा शेतातील काढलेला कांदा पावसामुळे भिजला, तर अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतही पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाल्याची माहिती बिजोटेचे सरपंच पोपट जाधव यांनी दिली.

Crop Damage
Maharashtra Rain : गहू, कांदा, हरभरा, आंबा, काजू पिकांचे वादळी पावसाने नुकसान, राज्यात आणखी पावसाची शक्यता

कळवण तालुक्यात नवीबेज, मोकभणगी, अभोणा या महसूल मंडलांत २.५ मिमीच्यावर पाऊस झाला असून ७५ हेक्टर क्षेत्रावर कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान आहे.तर, नाशिक तालुक्यात देवळाली, सातपूर, शिंदे, पाथर्डी, भगूर या महसूल मंडलांत २.५ मिमीच्या वर पाऊस झाला असून ४२.२० हेक्टर क्षेत्रावर पीक नुकसान झाले आहे. तर दिंडोरी तालुक्यात मोहाडी, कोशिंबे, लखमापूर या महसूल मंडलांत नुकसान आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. यात कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा आदी पिकांना फटका बसला आहे.

नुकसान असे:

वादळी वाऱ्यामुळे बागलाण तालुक्यातील घरांचे पत्रे उडाले

– आखतवाडे येथील डाळिंब उत्पादक भारत खैरनार यांच्या डाळिंबाच्या बागेचे संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हर वाऱ्यामुळे फाटले व डाळिंबाची झाडे आडवी.

– निरपूर येथील शेतकरी राकेश सूर्यवंशी यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाला आग

– अनेक ठिकाणी आंब्याच्या कैऱ्या खाली पडल्या

– वीज पडून धोंडबार (ता.सिन्नर) येथे रामचंद्र खेताडे यांची म्हैस मृत, तर निकवेल (ता.बागलाण) येथे पुंजाराम वाघ यांची गाय ठार

– कांदा काढणी सुरू असताना अचानक पावसामुळे कांदा भिजला, शेतकऱ्याची धावपळ

– डाळिंब बागांचा बहर व कळी अवस्थेतील फळे गळून पडली

– अनेक ठिकाणी कांदा बीज उत्पादन क्षेत्रावरील डेंगळे तुटून पडले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com