Unseasonal Rain : खानदेशात तुरळक पाऊस ; आणखी काही दिवस शक्यता असल्याने शेतकऱ्यांना धसका

Avkali Rain : खानदेशात मागील काही दिवसांपासून ढगाळ, उष्ण वातावरण आहे. अशात सोमवारी (ता.३१) अनेक भागांत तुरळक पाऊस झाला. आणखी काही दिवस पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे.
Unseasonal Rain
Unseasonal RainAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात मागील काही दिवसांपासून ढगाळ, उष्ण वातावरण आहे. अशात सोमवारी (ता.३१) अनेक भागांत तुरळक पाऊस झाला. आणखी काही दिवस पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे.

खरिपात अतिपावसात पिके हातची गेली. आता रब्बी व उन्हाळ हंगामातील पिकांची काढणी, मळणी, कापणी सुरू आहे. पिके हातातोंडाशी आलेली असातनाच पावसाळी वातावरण तयार झाले. काही भाहात सोमवारी तुरळक व मध्यम पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. सोमवारी सकाळपासून ढगाळ व पावसाळी वातावरण तयार झाले. यात दुपारी काही भागात तुरळक पाऊस झाला.

Unseasonal Rain
Maharashtra Rain Alert : तीन दिवस पावसाची शक्यता; माॅन्सूने देशाच्या आणखी काही भागातून माघार घेतली

जळगाव जिल्ह्यात भुसावळ, जळगाव, धरणगाव, चोपडा, जामनेर आदी भागात तुरळक पाऊस झाला. काही भागात सुसाट वाराही सुटला होता. सायंकाळी पुन्हा ढगांचा गडगडाट सुरू झाला. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतात कडब्याची कुट्टी पडून आहे. तसेच अनेकांचा मका खुडून त्याचे ढीग मळणीविना पडून आहेत.

चारा व मक्याची नासाडी होईल, या भितीने सायंकाळी अनेक शेतकरी शेतात पोचले व मका कणसे, चाऱ्याचे ढीग ताडपत्रीने झाकले. बाजरी पिकात कणसे पक्व झाली आहेत. परंतु सुसाट वाऱ्याने बाजरी पीक आडवे होण्याची भिती आहे. सोमवारी रात्रीही काही भागात तुरळक पाऊस झाला. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते.

अनेक शेतकऱ्यांची ज्वारी, हरभरा काढणीवर आहेत. अशात पाऊस झाला. कुठेही जोरदार किंवा अतिपाऊस झाला नाही. परंतु सुसाट वाऱ्याने काहींची पिके आडवी झाली. केळी पिकात पाने फाटल्याचा प्रकारही घडला. काही भागात दोन ते तीन मिलीमीटर पाऊस झाला. तर काही भागात यापेक्षा कमी पाऊस झाला. सुमारे दोन ते तीन मिनीटे तुरळक पाऊस सायंकाळी जळगाव, चोपडा, धरणगाव भागात झाला.  

काढणी, कापणी बंद
पावसाळी वातावरण  व पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी आदी पिकांची कापणी बंद केली आहे. तसेच कांदा पिकातील काढणीही थांबली आहे. परंतु तयार केळी, कलिंगड व पपई पिकात शेतकरी काढणी करून घेत आहेत. कारण या पिकांत काढणी रखडल्यास अधिकचे नुकसान होईल, अशी भिती शेतकऱ्यांना आहे. कलिंगड पिकात काढणीला गती आली. त्यात आवक वाढली यामुळे दरांवरही काहीसा परिणाम खानदेशात झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com