Jalgaon Rain Forecast : खानदेशात गारपीट, वादळी पावसामुळे केळी जमीनदोस्त, पशुधनाचीही हानी

Jalgaon Rain : खानदेशात पिकांसह पशुधनाची हानी होत असून, मंगळवारी (ता. ६) सायंकाळी झालेल्या गारपीट व वादळी पावसात जळगाव, धुळे व नंदुरबारात केळी, बाजरी, मका, कांदा, पपई आदी पिकांची मोठी हानी झाली आहे.
Jalgaon Rain Forecast
Jalgaon Rain Forecastagrowon
Published on
Updated on

Jalgaon Weather Update : जळगाव जिल्ह्यात भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, धरणगाव, चोपडा, एरंडोल, पारोळा या भागांत गारपीट व वादळी पाऊस झाला. भडगावातील आमडदे व परिसरात गाराच्या पावसाने पीकहानी झाली. एरंडोल तालुक्यात पद्मालय रस्त्यावर वीज कोसळून चार शेळ्या मृत्युमुखी पडल्या. जळू येथे वीज कोसळून धनसिंग शिंदे यांचा बैल मृत्युमुखी पडला. खडके खुर्द येथे वेडू पाटील यांच्या पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले. धरणगाव तालुक्यात एकलग्न येथे वीज कोसळून ढोलू पाटील यांची म्हैस दगावली.

जळगाव तालुक्यात नशिराबाद, खेडी खुर्द, फुपनगरी, कानळदा, पिलखेडा, नांद्रा बुद्रुक, किनोद, कठोरा, गाढोदे, भोकर, फुपणी, नंदगाव, पळसोद या भागांत गारपीट व वादळी पावसात केळी पीक जमीनदोस्त झाले. लहान पपईचे शेंडे वादळात तुटून नुकसान झाले.

Jalgaon Rain Forecast
Jalgaon Water Crisis : जळगाव जिल्ह्यात ५६५ गावांत पाणीटंचाई

चोपडा तालुक्यातील गोरगावले, खेडीभोकरी, मंगरूळ, चोपडा व अन्य भागातही गारपीट व वादळी पाऊस झाला. यात केळीची मोठी हानी झाली आहे. चोपड्यातील अडावद, लोणी, खर्डी, वडगाव, चांदसणी, पिंप्री, वटार, सुटकार, कमळगाव या भागांत गारपीट व वादळाने केळीची हानी झाली.

नंदुरबार जिल्ह्यात बलवंड व परिसरात कांदा पिकाची हानी पावसात झाली. शेतात साठविलेल्या चाऱ्याची नासाडीदेखील झाली. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात केळी, पपईची हानी लौकी शिवारात झाली आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर व परिसरातही वादळी पावसाने दाणादाण उडाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भुईमूग, कांदा पिकास अधिकचा फटका बसला. अनेक गावांत सुमारे ३० ते ४० मिनिटे वादळ सुरू होते.

नुकसानीचे पंचनामे सुरू झाले. केळीची १८ हजार हेक्टरवर हानी झाल्याचा अंदाज आहे. कांदा, मका, बाजरी या पिकांची नासाडी झाली. तसेच शेतातील चारा ओला होऊन तो खराब झाल्याने पशुधनासाठी चाऱ्याची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्‍न आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com