Crop Damage : जळगाव जिल्ह्यातील गारपीट, वादळग्रस्तांना भरपाई मिळेना

Crop Damage Compensation जिल्ह्यात मागील मार्च ते जून या दरम्यान वादळ, गारपिटीने चोपडा, जळगाव, रावेर, यावल आदी तालुक्यांतील केळी उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात मागील मार्च ते जून या दरम्यान वादळ, गारपिटीने चोपडा, जळगाव, रावेर, यावल आदी तालुक्यांतील केळी उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली. शासनाने पंचनामे केले. पण अद्याप भरपाई मिळालेली नाही. दुसरीकडे विमाधारक केळी उत्पादकांनाही भरपाईची प्रतीक्षाच आहे.

जळगाव तालुक्यातील पिलखेडे, कठोरा, किनोद, भोकर, सावखेडा आदी भागात केळीचे मोठे नुकसान झाले. तसेच रब्बीचेही नुकसान झाले. चोपडा तालुक्यातील गरताड, सनपुले, कठोरा, खेडीभोकरी, माचले, गोरगावले या भागातील केळी पिकांसह मका, बाजरी पिकांची मोठी हानी झाली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रावेरात दोन वेळेस वादळी पाऊस झाला. जुलैमध्येही मुक्ताईनगरात वादळी पावसात पीकहानी झाली होती. काही भागात केळी व इतर वृक्षांना पालाही शिल्लक राहिला नाही. केळी पीक मोडावे लागले. बाजरी, मक्याचे कुठलेही अवशेष शेतात दिसत नव्हते.

Crop Damage
Kharif Crop Damage : खरीप पिके वाया, रब्बीची पेरणीही खोळंबली

तब्बल ३५ मिनिटे वादळ, हलकी गारपीट झाली होती. यानंतर प्रशासनाने पंचनामे केले. लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. रावेर, यावल, चोपडा, जळगाव आदी भागांत सुमारे साडेचार हजार हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली.

Crop Damage
Crop Demonstration : दोन हजार हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके

ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेतून केळीसाठी विमा संरक्षण घेतले, त्यांच्या बागांचे पंचनामे प्रशासन व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी केले. या संबंधीचे अहवाल, माहिती विमा कंपनीकडे सादर करण्यात आली.

यंदा या योजनतून कमी व अधिक तापमान, वादळ, गारपीट याबाबतचे नुकसान झाल्यानंतरही परतावे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. लोकप्रतिनिधी फक्त घोषणाबाजी, शेतकऱ्यांसोबत चर्चा करून फोटोसेशन करतात. परंतु शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलेला नाही, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com