Flower Market : गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाबाला भाव

Rose Rate : गुरुपौर्णिमा हे भारतात गुरू-शिष्य परंपरेचे प्रतीक मानला जाणारा पवित्र सण आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे फुलांद्वारे आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात.
Floriculture
Rose Farming Agrowon
Published on
Updated on

Theane News : गुरुपौर्णिमा हे भारतात गुरू-शिष्य परंपरेचे प्रतीक मानला जाणारा पवित्र सण आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे फुलांद्वारे आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात. गुलाबफुल हे गुरूप्रती भावना व्यक्त करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाब फुलांची मागणी प्रचंड वाढली आहे.

सध्या डोंबिवलीतील बाजारात १० ते १५ रुपयांना विकले जाणारे एक फूल २५ रुपयांवर पोहचले आहे. गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेतले जातात. सध्या गुरुपौर्णिमेनिमित्त बाजारात गुलाबफुलांची मागणी वाढली आहे. मात्र, दरवाढीमुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांनी भेटवस्तूंचा पर्याय निवडला आहे.

Floriculture
Flower Farming: बाजारपेठेनुसार झेंडू, गॅलार्डिया लागवड

यामध्ये हस्तनिर्मित ग्रीटिंग कार्ड्स, डायरी, पेन, बुकमार्क्स, छोटे शोपीस, ध्यानयोगासंबंधित साहित्य, तसेच वॉल पेंटिंग्स यांचा समावेश आहे. गुलाबफुलांच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. साधारणतः जे लाल गुलाब दररोज १० ते १५ रुपये प्रति फूल विकले जात होते, तेच आता २० ते २५ रुपयांवर पोहोचले आहेत. मोठ्या आकाराचे आणि आकर्षक गुलाब ३० ते ३५ रुपयांपर्यंत विकले जात आहेत.

Floriculture
Flower Farming : पतीच्या समवेत शेती फुलवली, पुढे नेली

हस्तनिर्मित कार्ड्स

अनेक जण आपल्या आईला गुरू मानतात. तर काही जणांचे आदर्श व्यक्ती असते. त्यांच्या आठवणीत आपण राहावे यासाठी हस्तनिर्मित कार्ड्स तयार करतात. यामुळे गुरुजण किंवा आई यांचा आनंद द्विगुणित होतो.

दरवर्षी मी माझ्या शिक्षिकेला एक गुलाब आणि छोटा बुके देते. पण यावर्षी फुल खूप महाग झाले आहेत. तरीही हा दिवस असा आहे की, श्रद्धेने दिलेली गोष्ट महत्त्वाची आहे.
- श्रेया वाघमारे, विद्यार्थिनी
तीन दिवसांपासून गुलाबाची मागणी खूप वाढली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी विशेष ऑर्डर्स येत आहेत. त्यामुळे आम्ही फुलांची साठवणूक आधीच वाढवली होती; पण तरीही पुरवठा कमी पडत आहे.
- वरुण कदम, विक्रेता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com