HTBT Cotton Seeds: एचटीबीटीचे गुजरात कनेक्शन, तस्करी वाढली

Cotton Smuggling: महाराष्ट्रात बंदी असलेली एचटीबीटी कपाशी बियाण्यांची तस्करी गुजरातहून होत असल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाच्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बियाणे जप्त झाले असून शिक्षा अल्प असल्याने ही तस्करी रोखणं कठीण ठरत आहे.
HTBT Seed
HTBT Seed Agrowon
Published on
Updated on

Amaravati News: महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची तस्करी प्रामुख्याने गुजरातमधूनच होत असल्याचे कृषी विभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीतून अधोरेखित झाले आहे. या प्रकरणात दाखल गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण अल्प असल्याने व पोलिस विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने तस्करी रोखण्यात व त्यावर नियंत्रण मिळवण्यात कृषी विभाग हतबल झाला आहे.

अमरावती जिल्ह्यात प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे जप्तीच्या पाच कार्यवाही करण्यात आल्या आहेत. यात प्रतिबंधित ४७४ पाकिटे जप्त करण्यात आली असून त्याची किंमत पाच लाख ५५ हजार ६६२ रुपये आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने येवदा येथे पहिली कारवाई केली. या कारवाईने जिल्ह्यातील एचटीबीटीचा प्रवेश अधोरेखित केला. त्यानंतर अमरावती शहरातील वेलकम पॉइंट, अंजनगावसुर्जी, पथ्रोटनजीकच्या जनुना व धामणगावरेल्वे येथे तस्करी करून विक्रीसाठी आणलेले बियाणे जप्त करण्यात आले.

HTBT Seed
Cotton Seeds Seized Nashik : नाशिक जिल्ह्यात अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

खरीप हंगामातील कपाशी हे मुख्य पीक असून एचटीबीटी वाणांच्या बियाण्यांची उत्पादनाची सरासरी अधिक असल्याने शेतकऱ्यांचाही कल या बियाण्यांकडे अधिक आहे. मात्र राज्यात या बियाण्यांवर प्रतिबंध असल्याने ते खुल्या बाजारात मिळत नाही. या बियाण्यांच्या उत्पादक कंपनी गुजरातमध्ये अधिक असल्याने तेथून तस्करीने बियाणे आणली जातात.

महाराष्ट्रात या बियाण्यांवर बंदी असल्याने हंगामापूर्वी कृषी विभागाला त्यासाठी दक्ष राहावे लागते. भरारी पथक स्थापन करून नियंत्रणासह तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला जातो. गत वर्षीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असली तरी या प्रकरणात शिक्षेची कठोर कारवाई न झाल्याने तस्करांचे मनोबल वाढले आहे. पोलिस विभागाकडून याप्रकरणात पुढील तपास अपेक्षित आहे.

HTBT Seed
Cotton Seed : कापूस बियाणे विक्रीस कमी प्रतिसाद

राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी अनधिकृत बियाण्यांची पाळेमुळे खोदण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. तत्कालीन पोलिस उपमहासंचालक कृष्णप्रकाश यांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अनेकदा गुजरातमध्ये या प्रकरणात तपास केला. परंतु वाढता दबाव आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ही समिती पुढे गुंडाळण्यात आली.

आतापर्यंतची कार्यवाही

तारीख : घटनास्थळ : जप्ती : किंमत

६ मे : येवदा : ७ पाकिटे : ७,७००

८ मे : वेलकम पॉइंट : १०० पाकिटे : १,२५,०००

१९ मे : अंजनावसुर्जी : १७४ पाकिटे : २,४४,३८७

२० मे : जनुना (अचलपूर ) : १९ पाकिटे : २०,९००

२० मे : धामणगावरेल्वे : १७४ पाकिटे : १,५७,६७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com