Farm Pond : शेततळ्यांतील मृत्यू रोखण्यासाठी अखेर मार्गदर्शक सूचना तयार

Agriculture Department : राज्य शासनाच्या अनुदानातून उभारल्या जात असलेल्या शेततळ्यांमध्ये पडून शेकडो मृत्यू झाल्यानंतर आता कुठे कृषी विभाग जागा झाला आहे. दुर्घटना रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी सुचविलेले चार उपाय अखेर स्वीकारण्यात आले आहे.
Farm Pond
Farm PondAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे ः राज्य शासनाच्या अनुदानातून उभारल्या जात असलेल्या शेततळ्यांमध्ये पडून शेकडो मृत्यू झाल्यानंतर आता कुठे कृषी विभाग जागा झाला आहे. दुर्घटना रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी सुचविलेले चार उपाय अखेर स्वीकारण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून वैयक्तिक शेततळे राज्यभर बांधली जात आहेत. शेततळे उभारणीच्या सर्व मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केल्या आहेत. परंतु यात वैयक्तिक सुरक्षिततेसाठी काहीही बंधन टाकण्यात आलेले नाही. शेततळे उभारणीच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालयाच्या मृद्संधारण विभागाने तयार केलेल्या होत्या. यात मार्गदर्शक सूचनांमध्ये अपघात रोखण्यासाठी सक्तीचे उपाय समाविष्ट करण्याऐवजी केवळ एक हमीपत्र लिहून घेण्याची तरतूद आहे.

Farm Pond
Farm Pond : शेततळ्यांमधील अपघात रोखण्यासाठी नियमावलीत बदल करण्याचा आग्रह

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शेततळ्यांमध्ये पडून राज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असतानाही कृषी विभागाने तळ्यांमध्ये सक्तीच्या उपाय करण्यास भाग पाडलेले नाही. ‘शेततळ्यासाठी स्वखर्चाने कुंपण बांधले जाईल. तसेच सुरक्षिततेच्या उपायाची आम्ही काळजी घेऊ,’ असे मोघम लेखी पत्र शेतकऱ्यांकडून घेतले जात आहे. मात्र शेतकऱ्याने नेमक्या काय उपाययोजना करायच्या याविषयी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कधीही मार्गदर्शन केले नाही अथवा दर महिन्याला तळ्यात पडून ३ ते ५ जणांचा मृत्यू होत असताना उपाययोजनांची सक्तीदेखील केली नाही. त्यामुळे हा मुद्दा जुन्नर येथील ‘सह्याद्री’ गिरfभ्रमण संस्थेने कृषी विभागाच्या सर्वप्रथम निदर्शनास आणून दिला. या संस्थेने दोन वेळा लेखी पत्रे दिल्यानंतरही कृषी आयुक्तालयाने केराची टोपली दाखवली. दुसऱ्या बाजूला, सुरक्षेविषयक नियमावलीचा अभाव असल्यामुळे तळ्यात बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत होती.

‘अॅग्रोवन’कडून या विषयाला सातत्याने प्रसिद्धी देण्यात आली. तसेच राज्याच्या मृद्संधारण विभागाचे संचालक रवींद्र भोसले यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यामुळे अखेर श्री. भोसले यांनी शेततळ्यांमधील दुर्घटना रोखण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसाठी एक परिपत्रक २८ जून रोजी जारी केले आहे. ‘‘परिपत्रकात सुचविलेल्या उपायांची अंमलबजावणी केल्यास तळ्यांमध्ये होणाऱ्या अपघात किंवा दुर्घटनांच्या वेळी बुडणाऱ्या व्यक्तींचे जीव वाचणे शक्य आहे. त्यामुळे या उपायांना क्षेत्रियस्तरावर प्रसिद्धी द्यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालक कार्यालयाकडे पाठवावा,’’ अशा सूचनादेखील श्री. भोसले यांनी दिल्या आहेत.

अपघात रोखण्यासाठी चार उपाय लागू
शेततळ्याच्या आकारमानानुसार जलतरण  तलावांवर वापरल्या जाणाऱ्या ट्यूब ठेवावे लागेल.
शेततळ्याच्या चोहोबाजूंनी गाठी मारलेले दोरखंड लावावे लागेल.
शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदावर पाण्याच्या उताराच्या बाजूने दोरखंडाची चौकोनी जाळी लावावी लागेल.
शेततळ्याच्या चारही दिशांना लाइफ जॅकेट कायमस्वरूपी ठेवावी लागतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com