Farm Pond : शेततळ्यांमधील अपघात रोखण्यासाठी नियमावलीत बदल करण्याचा आग्रह

राज्याच्या विविध भागांमध्ये शेततळ्यांमध्ये पडून होत असलेल्या दुर्घटना नियंत्रित आणण्यासाठी मूळ नियमावलीत बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Farm Pond Scheme
Farm Pond SchemeAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Farm Pond Scheme : पुणे ः राज्याच्या विविध भागांमध्ये शेततळ्यांमध्ये (Farm Pond) पडून होत असलेल्या दुर्घटना नियंत्रित आणण्यासाठी मूळ नियमावलीत बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
राज्यात सध्या एक लाखापेक्षा अधिक शेततळी आहेत. मात्र, शेततळ्यांचे नियम करताना मानवी तसेच प्राण्यांना होत असलेल्या अपघातांना टाळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

पुण्याच्या जुन्नर भागातील सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने या बाबत कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांना अलीकडेच एक निवेदन सादर केले. शेततळ्याची उभारणी करताना कृषी विभागाने लागू केलेल्या नियमांमध्ये आणखी चार अटी समाविष्ट करण्याचा आग्रह या संस्थेने धरला आहे.

राज्यात कोणत्याही भागात सध्या अस्तित्वात असलेल्या व भविष्यात उभारल्या जाणाऱ्या शेततळ्याच्या ठिकाणी सुरक्षा साधने बंधनकारक करावी, असे या संस्थेचे म्हणणे आहे.

शेततळ्याच्या आकारमानानुसार जलतरण तलावांवर वापरल्या जाणाऱ्या ट्यूब, फ्लोट तसेच धर्माकोलच्या किमान पाच ताटल्या ठेवल्या जाव्यात, शेततळ्याच्या चोहोबाजूंनी गाठी मारलेले किमान दहा दोरखंड लावले जावेत, तळ्यामध्ये दोरखंडाची चौकोनी जाळी प्लॅस्टिक कागदाच्या उतारावर लावली जावी तसेच तळ्याच्या चारही दिशांना किमान चार लाइफ जॅकेट कायमस्वरूपी ठेवली जावीत.

या सर्व उपायांचा समावेश मूळ नियमावलीत झाल्यास तळ्याच्या ठिकाणी सुरक्षितता वाढेल, असे संस्थेचे म्हणणे आहे.

Farm Pond Scheme
Farm Pond Scheme : शेततळे योजनेपासून हजारो शेतकरी वंचित

सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री व सचिव धनंजय कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, या उपाययोजना लागू केल्याशिवाय राज्यात शेततळ्यांमध्ये होत असलेल्या अपघातांचे प्रमाण अजिबात कमी होणार नाही.

सध्या असलेल्या शेततळ्यांमध्ये त्वरित उपाय लागू कराव्यात त्याची खातरजमा करण्यासाठी आयुक्तांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना द्यायला हव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com