Jalgaon News : ‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त निंबोल (ता. रावेर) येथील ग्रामपंचायतीच्या आवारात केळी पीक व्यवस्थापनाबाबत ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला. यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा. ली. हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश महाजन, विषय विशेषज्ञ डॉ. धीरज नेहेते यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील होते.
प्रमुख पाहुणे रावेर फळबागायतदार संघाचे अध्यक्ष रामदास पाटील, यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा. लि. चे क्षेत्रीय व्यवस्थापक सागर कळमकर, टेरिटरी मॅनेजर गोपाल देवकर होते.
शास्त्रज्ञ महाजन म्हणाले, की केळीच्या निकोप वाढीसाठी वाण निवडीपासून ते काढणीपर्यंत काळजी घ्यावी लागते. त्यासाठी सिंचन, खते व अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे लागते. जमीन निवडदेखील महत्त्वाची आहे. अलीकडे रोगराई येत आहे. त्यात तग धरण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरून खर्च मर्यादीत ठेवणेदेखील आवश्यक आहे.
डॉ. नेहेते म्हणाले, की केळी पीक संवेदनशील आहे. या पिकासंबंधी शेतकरी सजग आहेत. पण आपत्ती येते. त्याला तोंड देण्यासाठी शास्त्रीय उपाययोजना आवश्यक आहेत. करपा, कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) याबाबतही त्यांनी माहिती दिली. तसेच रोगराईत खत व्यवस्थापनासंबंधी मुद्दे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.