Guava Processing : पेरू प्रक्रियेचे तंत्र

Guava Production : पेरू हे फळ जीवनसत्त्व क आणि तंतुमय घटकांचा उत्तम स्रोत आहे. जीवनसत्त्व क आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेसाठी चांगले असतात. 
Guava Farming
Guava FarmingAgrowon
Published on
Updated on

प्रीती भोसले,डॉ.विजया पवार

Guava Processing :

ज्यूस

साहित्य : ५ पेरू, अर्धा कप साखर, १/४ कप पाणी

कृती : पेरू धुवून कापून घ्यावेत. ब्लेंडरमध्ये पेरू, साखर आणि पाणी घालून बारीक करून घ्यावे.ज्यूस गाळून थंड करावा.

स्मूदी

साहित्य :२ पेरू, १ कप दूध, १ चमचा मध, १/२ चमचा वेलची पावडर

कृती : पेरू धुवून कापून घ्यावेत. ब्लेंडरमध्ये पेरू, दूध, मध आणि वेलची पावडर बारीक करून घ्यावी. ही स्मुदी थंड करावी.

Guava Farming
Guava Production : दर्जेदार पेरू उत्पादनात मिळवले नाव

चटणी

पेरूच्या गोड-तिखट चवीसोबत आले आणि मिरचीचा तिखटपणा यामुळे चटणी चविष्ट होते.

साहित्य : बारीक चिरलेले २ पेरू, बारीक चिरलेले१/२ कप आले,बारीक चिरलेली १/४ कप हिरवी मिरची, १/४ चमचा जिरे, चवीप्रमाणे १/२ चमचा मोहरी मीठ-लिंबू.

कृती : एक पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे आणि मोहरी घालून तडका करावा.तडका फुटल्यावर त्यात आले आणि हिरवी मिरची घालून परतून घ्यावी. त्यामुळे बारीक चिरलेले पेरू चांगले मिसळून घ्यावेत.चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालावा. मिश्रण शिजून घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवावे. हे मिश्रण थंड होऊ द्यावे.

हलवा

साहित्य: ५ पेरू, २ कप दूध, १/२ कप साखर, १/४ कप काजू किंवा बदाम

कृती: पेरू धुवून कापून घ्यावेत. तुकडे ब्लेंडरमध्ये बारीक करून घ्यावेत.एक कढईत दूध गरम करावे.दूध उकळल्यावर त्यात पेरूचा पल्प मिसळावा. त्यामुळे साखर चांगली मिसळून घ्यावी. हलवा घट्ट होईपर्यंत शिजवावा. हलवा थंड झाल्यावर त्यामध्ये काजू किंवा बदाम मिसळावेत.

Guava Farming
Ratndip Guava Variety : ‘रत्नदिप’ पेरू जातीला स्वामित्व हक्क प्राप्त

जॅम

साहित्य : १ किलो बारीक चिरलेले पेरू, १/२ कप साखर, १/२ लिंबाचा रस, १/४ चमचा वेलची पावडर

कृती : पेरू धुऊन,  साल काढून बारीक चिरून घ्यावेत. एका पॅनमध्ये पेरू घेऊन मंद आचेवर शिजवावेत. मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि पेरूने स्वतःचा रंग सोडेपर्यंत शिजवावा. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात साखर मिसळावी. चवीनुसार लिंबाचा रस आणि वेलची पावडर मिसळावी.मिश्रण घट्ट होईपर्यंत ५ ते ७ मिनिटे शिजवावे. जॅम थंड होऊ द्यावा. स्वच्छ आणि कोरड्या भरण्याच्या बाटल्यांमध्ये जॅम भरून थंड जागी साठवावा.

टीप : पेरू जास्त पिकलेले असतील तर जॅम अधिक गोड होईल. गरजेनुसार जॅममध्ये आले, दालचिनी मिसळावी. जॅम जास्त टिकवून ठेवण्यासाठी बाटल्यांचे झाकण चांगले बंद करावे आणि उकळत्या पाण्यात १० मिनिटे बाटली उकळून घ्यावी.

चहा

पेरूच्या गोड आणि तिखट चवीसोबतच आल्याची तिखटपणा आणि गवती चहाचा सुगंध यामुळे हा चहा चविष्ट होतो.

साहित्य : बारीक चिरलेले २ पेरू, १ चमचा चहा पावडर, १/२ लिटर पाणी, १/२ चमचा किसलेले आले, १ इंच आल्याची फोड, चवीप्रमाणे मध. 

कृती : एक पॅनमध्ये पाणी गरम करावे. त्यामध्ये चहा पावडर आणि किसलेले आले मिसळून उकळी आणावी. त्यानंतर बारीक चिरलेले पेरू मिसळून २ ते ३ मिनिटे शिजवावे. हा चहा गाळून घ्यावा. चवीसाठी मध किंवा साखर मिसळावी.

जेली

साहित्य : १ किलो बारीक चिरलेले पेरू, १/२ कप पाणी, १ कप साखर, २ चमचे जेली पावडर

कृती : पेरू धुवून, साल काढून बारीक चिरून घ्यावेत. पॅनमध्ये पेरू आणि पाणी घालून मंद आचेवर शिजवावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि पेरूने स्वतःचा रंग सोडेपर्यंत शिजवावे. मिश्रण थंड करून गाळून घ्यावे. दुसऱ्या पॅनमध्ये गाळलेला रस घालून गरम करावा. त्यामध्ये साखर मिसळावी. साखर विरघळल्यावर जेली पावडर मिसळावी. जेली घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवावे. जेली थंड करावी.स्वच्छ आणि कोरड्या बाटल्यांमध्ये जेली भरून थंड जागी साठवावी.

टीप : पेरू थोडे कच्चे असतील तर जेली अधिक घट्ट आणि चांगली जमेल.

- प्रीती भोसले, ८७६७९२०३८४

- डॉ. विजया पवार, ९४२०६२६५३३

(अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com