Kapil Dhoke
Kapil Dhoke Agrowon

Radhakrishna Vikhe Patil : पालकमंत्री विखे पाटलांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला : ढोके

Kapil Dhoke : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आतापर्यंतचे सर्वांत अपयशी पालकमंत्री आहेत. जिल्ह्याकडे करीत असलेले दुर्लक्ष पाहता पुढील दिवसांमध्ये ‘पालकमंत्री हरवले आहेत’
Published on

Akola News : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आतापर्यंतचे सर्वांत अपयशी पालकमंत्री आहेत. जिल्ह्याकडे करीत असलेले दुर्लक्ष पाहता पुढील दिवसांमध्ये ‘पालकमंत्री हरवले आहेत’ अशा पद्धतीचे कॅम्पेन आम्ही हाती घेऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी दिला.

स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. अभय पाटील, विजय देशमुख यांच्यासह इतर उपस्‍थित होते. श्री. ढोके म्हणाले, की परंतु सध्याचे पालकमंत्री फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात आलेलेच नाहीत.

Kapil Dhoke
Monsoon Session 2024 : १५ जुलैपर्यंत अतिवृष्टी व अवकाळीची मदत शेतकऱ्यांना वितरित करणार; विधानसभेत मंत्री अनिल पाटील यांची माहिती

त्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाला भेटी देऊन पाहणी करण्याचे धे सौजन्य सुद्धा दाखवले नाही. अनेक प्रशासकीय कामे जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत. त्यांचा आढावा सुद्धा पालकमंत्र्यांनी घेतलेला नाही.

Kapil Dhoke
Land Acquisition : भूसंपादन मावेजासह अन्य मागण्यांसाठी ‘किसान संघ’ आक्रमक

महत्त्वाच्या खरिपाच्या नियोजन बैठकीलाही ते उपस्थित नव्हते. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बियाणे व खताचा तुटवडा आहे. अनेक बँकांमध्ये पीक कर्जासाठी शेतकरी चकरा मारत आहेत. बँका पीककर्ज देताना शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. अशा वेळी पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे असताना ते जिल्ह्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत.

ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे. जिल्ह्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी हे महत्त्वाचे पद मे २०२३ पासून रिक्त आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद ४ महिन्यांपासून रिक्त आहे. याकडे लक्ष द्यायला सुद्धा विखे पाटील यांना अद्याप वेळ मिळाला नाही, असे सांगत ढोके यांनी विखे पाटील यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com