Water Contamination : काळे-पिवळे पाणी पोचले पालकमंत्र्यांपर्यंत

Latur Water Crisis : लातुरात दोन महिन्यांपासून नळाद्वारे येणाऱ्या काळ्या-पिवळ्या पाण्याबाबत ‘सकाळ’मधून येत असलेल्या वृत्तमालिकेची पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दखल घेतली आहे.
Contaminated Water Supplay
Contaminated Water SupplayAgrowon
Published on
Updated on

Latur News : लातुरात दोन महिन्यांपासून नळाद्वारे येणाऱ्या काळ्या-पिवळ्या पाण्याबाबत ‘सकाळ’मधून येत असलेल्या वृत्तमालिकेची पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दखल घेतली आहे. काळ्या-पिवळ्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. या प्रश्नांबाबत दिवसातून चारवेळा ते संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून संवादही साधत आहेत.

लातुरात कधी काळे, तर कधी गढूळ पाणी नागरिकांना नळाद्वारे मिळत आहे. त्यामुळे भरउन्हाळ्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पण, दोन महिने उलटत चालले, तरी महापालिकेला पिवळ्या पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. याबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिका सुरू केली आहे. या वृत्तमालिकेची पालकमंत्री भोसले यांनी दखल घेतली आहे.

Contaminated Water Supplay
Contaminated Water Supply : लातूरला काळ्या रंगाचे पाणी ; ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी

जिल्हा प्रशासनातील आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुधवारी (ता. २३) दिवसभरात चारवेळा पालकमंत्री भोसले यांनी दूरध्वनी केला. शेवटचा दूरध्वनी रात्री बाराच्या सुमारास केला गेला. त्यानंतर गुरुवारीही (ता. २४) या प्रश्नाबाबत सकाळी दूरध्वनी करून दिवसभर पिवळ्या पाण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल रात्री उशिरा आमच्याकडे सादर करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनातील आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील भेटी वाढल्या आहेत. गरज पडल्यास या क्षेत्रामधील मुंबईतील तज्ज्ञाला लातूरमध्ये आणण्याचा निर्णयही पालकमंत्री घेणार आहेत.

Contaminated Water Supplay
Contaminated Water : जालन्यातील ८७ गावांतील पाणी पिण्यासाठी अयोग्य

पालकमंत्री तीन दिवस लातुरात

पालकमंत्री भोसले हे तीन दिवस लातूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते बुधवारी (ता. ३०) लातुरात येतील. बुधवार (ता. ३०), गुरुवार (ता. एक) या दोन दिवस मुक्काम करून ते शुक्रवारी (ता. दोन) परत जाणार आहेत, असे त्यांच्या कार्यालयातर्फे ‘सकाळ’ला सांगण्यात आले. या दौऱ्यात लातूरच्या पिवळ्या पाण्याचा आणि नागरिकांना आठवड्यातून एकदाच मिळणाऱ्या पाण्याचा विषय चर्चेला येणार आहे. यासाठी ते महापालिकेला किंवा जलशुद्धीकरण केंद्राला भेटही देण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com