Groundnut Farming : उन्हाळी भुईमूग लागवडीचे तंत्र

Summer Farming : उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असल्याने रोग व किडींची समस्या कमी उद्भवते. ओलिताची व्यवस्था असल्यास तसेच व्यवस्थित नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
Groundnut Farming
Groundnut FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. भागवत चव्हाण

Agriculture Tips : उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असल्याने रोग व किडींची समस्या कमी उद्भवते. ओलिताची व्यवस्था असल्यास तसेच व्यवस्थित नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यामध्ये भुईमुगाबरोबर तीळ, बाजरी, मूग, चवळी यांसारखी आंतरपिके किंवा मिश्रपीक म्हणून घेतल्यास चांगला फायदा मिळू शकतो.

भुईमूग लागवडीसाठी मध्यम चांगली भुसभुशीत, कॅल्शिअम आणि सेंद्रिय पदार्थयुक्त, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ असावा. चिकण माती किंवा भारी जमीन भुईमुगाच्या लागवडीसाठी योग्य नाही.

लागवड करण्यापूर्वी जमीन १२ ते १५ सेंटीमीटर खोल नांगरावी. जास्त खोल नांगरणी टाळावी. त्यामुळे शेंगा जमिनीत खोलवर जाऊन काढणी कठीण होते. नांगरणीनंतर जमीन उभी-आडवी कुळवणी करून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीनंतर जमिनीत पुरेसे कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. हेक्टरी १० ते १५ टन कंपोस्ट किंवा शेणखत पुरेसे असते.

Groundnut Farming
Groundnut Farming : अकोला, वाशीममध्ये उन्हाळी भुईमुगाला पसंती

भुईमुगाचे उपटे, निमपसऱ्या आणि पसऱ्या असे प्रकार असतात. उपटा प्रकारातील पीक तीन ते चार महिन्यांत पीक तयार होते. पसरा आणि निमपसरा प्रकारातील पीक साधारणतः चार ते सहा महिन्यांत पीक तयार होते.

पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत करावी. या काळात हवामान उबदार असते. बियाणे चांगले रूजते. जमीन ओलावून त्यानंतर वापशावर पाभरीने किंवा बियाणे टोकून पेरणी करावी. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाण्याची बचत होते आणि उगवण अधिक चांगले होते. पेरणी करताना दोन ओळींमध्ये सुमारे ३० सेंटीमीटर आणि दोन झाडांमध्ये सुमारे १० सेंटीमीटर अंतर ठेवावे. यामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा प्रकाश, पाणी आणि पोषक तत्त्वे मिळतील.

उन्हाळी हंगामासाठी फुले उन्नती, फुले भारती, फुले चैतन्य या शिफारशीत जातींची लागवड करावी. छोट्या दाण्याच्या जातींसाठी प्रति हेक्टर १०० किलो, मध्यम आकाराच्या दाण्याच्या जातींसाठी १२५ किलो आणि मोठ्या दाण्याच्या जातींसाठी १२५ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. या प्रक्रियेनंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणी करावी. बीजप्रक्रियामुळे उगवण क्षमता वाढते. यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ मिळते.

Groundnut Farming
Summer Groundnut Variety : उन्हाळी हंगामासाठी भुईमूगाचे महत्वाचे पाच वाण

पेरणीपूर्वी जमिनीत पुरेसे सेंद्रिय खत म्हणजेच शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. प्रति हेक्टरी १० टन सेंद्रिय खत पुरेसे असते. पेरणीच्या वेळी माती परिक्षण अहवालानुसार प्रति हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद द्यावे. याशिवाय उत्पादनात वाढ करण्यासाठी जिप्सम खताचा वापर करावा. प्रति हेक्टरी ४०० किलो जिप्सम द्यावे. यापैकी २०० किलो पेरणीच्या वेळी आणि उर्वरित २०० किलो आऱ्या सुटताना द्यावे.

पीक उगवल्यानंतर सुमारे २० दिवसांनी आणि फुले येण्याच्या आधी एक खुरपणी आणि दोन कोळपण्या कराव्यात. आऱ्या येऊ लागल्यानंतर कोणतीही आंतरमशागत करू नये. या काळात

मोठे रिकामे पिंप पिकावर फिरविल्याने जमिनीत शिरणाऱ्या आऱ्यांचे प्रमाण वाढते आणि उत्पादन वाढते.

जमिनीची वाफसा स्थिती असताना पेरलेल्या बियाणाची उगवण चांगली होण्यासाठी, पेरणीनंतर ३-४ दिवसांनी हलके पाणी द्यावे. जमिनीच्या प्रकारानुसार, ८ ते १० दिवसांच्या

अंतराने १० ते १२ वेळा पाणी द्यावे. भुईमुगाच्या संवेदनशील अवस्थेत, जमिनीत पुरेसा ओलावा असणे फार महत्त्वाचे आहे. विशेषतः तुषार सिंचनाने पाणी देणे उत्पादनाच्यादृष्टीने फायद्याचे ठरते.

संवेदनशील अवस्था

संवेदनशील अवस्था दिवस

फुले येण्याची अवस्था पेरणीनंतर २५-३० दिवस

आऱ्या सुटण्याची अवस्था पेरणीनंतर ३५-४५ दिवस

शेंगा पोसण्याची अवस्था पेरणीनंतर ६५-७० दिवस

डॉ. भागवत चव्हाण, ९४०४५५१००९

(सहायक प्राध्यापक,कृषी विज्ञान विद्याशाखा,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com