Ground Temperature : जमीन तापमानाचे संशोधन संस्थांना नाही गांभीर्य

Ground Temperature Record : विदर्भात अकोला कृषी विद्यापीठाशिवाय कोणाकडेच नाही नोंदींची सुविधा
Temperature
TemperatureAgrowon

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोला येथील मुख्यालय वगळता विदर्भात इतरत्र कोठेही जमीन तापमानाची नोंद घेण्याची सोय नाही. त्यामुळेच जमिनीचे वाढते तापमान हा विषय संशोधक संस्थांसह कृषी विभागाने तितक्‍या गांभीर्याने घेतलाच नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

पृथ्वीच्या तापमानात वाढीचा मुद्दा समोर आल्यानंतर जागतिकस्तरावर चिंतेचे सावट पसरले. त्यानंतर वातावरणातील तापमान आणि जमिनीचे तापमान यावरही मंथन सुरू झाले. कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. दिनेश पैठणकर यांच्या मते सूर्यकिरण एकाच जागेवर तासनतास पडत असल्याने वातावरणात ४५ अंश सेल्सिअस तापमान असेल तर जमिनीचे तापमान हे ५ ते १० अंश सेल्सिअसने वाढते. त्याचा परिणाम पिकावर होतो व ते करपण्याची भीती राहते. त्यामुळेच जमिनीचे तापमान हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. अशा स्थितीत केव्हीके, कृषी महाविद्यालयस्तरावर अशाप्रकारची यंत्रणा असणे अपेक्षित आहे.

Temperature
Ground Water : भूजल साठा वाढविण्यासाठी संशोधन महत्त्वाचं

ग्रामीण कृषी हवामान सेवा अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषी हवामान केंद्र काही ‘केव्हीके’मध्ये उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये साकोली (भंडारा), बुलडाणा, वाशीम तसेच नागपूर कृषी महाविद्यालय या ठिकाणी जमिनीतील सेन्सर खराब झाल्याने याची नोंद घेतली जात नाही. दुर्गापूर (अमरावती) येथील जिल्हा कृषी हवामान केंद्रावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपली आहे. परिणामी या ठिकाणी आता कोणत्याच प्रकारची नोंद होत नाही, असे सांगितले जाते.


तापमान, पाऊस अशा नोंदी आम्ही घेतो. जमिनीच्या तापमानाशी आमचा संबंध राहत नाही. जमीन तापमान हा कृषी संशोधन संस्था तसेच कृषी विभागाशी निगडित विषय आहे. परिणामी भारतीय हवामान खात्याकडून जमीन तापमानाच्या नोंदी घेतल्या जात नाहीत.
- मोहनलाल साहू,
व्यवस्थापक, भारतीय हवामान खाते, नागपूर केंद्र


ब्रिटिश काळात १८७५ साली आयएमडी अस्तित्वात आली. त्यानंतर १९३२ दरम्यान अंतर्गत ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी ही संकल्पना त्यांनी आणली. अशाप्रकारे एकूण ६००० वेधशाळा देशभरात आहेत. राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर ६० वेधशाळा विविध प्रक्षेत्रावर आहेत. हा डाटा देखील ‘आयएमडी’कडे जातो. ब्रिटिशांनी त्याकाळी कृषी हवामान शास्त्राचे महत्त्व जाणले होते. परंतु त्यानंतर दुर्दैवाने या क्षेत्रात पुढे अपेक्षित काम झाले नाही.
- रामचंद्र साबळे,
सदस्य, दक्षिण आशिया फोरम, ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com