Department of Water Resources : शेतकरी आणखी खोलात जाणार, १३०० रूपये पाणीपट्टी भरावे लागणार १३ हजार

Farmers Agriculture Water Bill : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नवी अध्यादेश काढत हेक्टरी पाणीपट्टीत दहापटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Department of Water Resources
Department of Water Resourcesagrowon
Published on
Updated on

Agriculture News : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नवी अध्यादेश काढत हेक्टरी पाणीपट्टीत दहापटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या निर्णयाने शेतकऱ्यांचे विनाकारण हजारो रुपये वाया जाणार आहेत. यावर विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यानंतर आता शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाला निवेदन देत ही मागणी रद्द करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे हेक्टरी पाणीपट्टीत दहापटीने केलेली वाढ रद्द करावी, मार्च ते जून याकाळात उपसाबंदी करू नये, यांसह विविध मागण्यांचे निवेदन पाटबंधारे विभागाचे अभियंता अभिजित म्हेत्रे यांना देण्यात आले. माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, जलसंपत्ती प्राधिकरणाने गेल्या वर्षी सिंचनासाठी केला जाणारा पाणीपुरवठा घनमापन पद्धतीने बंधकारक केला आहे. जलमापन यंत्राद्वारे पाण्याचे मोजमाप करून सिंचनासाठी शेतीसाठी पाणी वापर करावा, असे सूचित केले आहे.

यासोबत आणखी एक सुधारित आदेश काढला असून त्यात घनमापनने द्यावयाच्या २०१८ वर्षी एक हजार ११२ रुपये व स्थानिक कर २० टक्के आहे. त्यात वाढ केली आहे. त्यानुसार प्रतिहेक्टरी ११ हजार ३४० व स्थानिक कर २० टक्के असा सर्व मिळून १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर पाणीपट्टी वाढ केली आहे.

Department of Water Resources
Sugarcane Farmer : ऊसतोड टोळ्यांकडून शेतकऱ्यांची उघड लुबाडणूक, साखर कारखानदारांची मिलीभगत?

दरम्यान, याच मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयासही देण्यात आले. शिष्टमंडळात वसंत पाटील, शिवाजी झांजगे, मनोज पाटील, सुशांत जाधव, आनंदराव पाटील, यशवंत चव्हाण, आनंदा रणदिवे, शंकर पाटील, दौलती कांबळे, बापूसो लिगाडे, कृष्णात चौगुले आदींचा समावेश होता.

राजू शेट्टीही आक्रमक

शेतीच्या पाणीपट्टी दरात तब्बल दहापट दरवाढ आणि कृषिसिंचन पंपांना मीटर बसविण्याचा काढलेला अवसान घातकी फतवा शेतकऱ्यांनी धुडकवायला हवा. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या पाणीपट्टी दरवाढीच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचा लढा उभारणार आहे. सरकारला वठणीवर आणण्यासाठी लवकरच जलसंपदा विभागाच्या पुणे कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com