Akola News : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांच्या जोडीनेच नवनवीन फळपिकांकडे वळत आहेत. अकोला येथील युवराज कदम यांनी लोणी-कदमापूर (ता. खामगाव) शिवारात असलेल्या शेतात २०२१ मध्ये ग्रेपफ्रूट या लिंबू वर्गीय फळाची लागवड केली असून यंदा या बागेत फळे लागली आहेत. नावीन्यपूर्ण असलेले हे फळ सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.
मोठ्या शहरात मिळणाऱ्या ग्रेपफ्रूट्चे उत्पादन आता विदर्भाच्या भूमीतही होऊ लागले आहे. कदम यांनी २०२१ मध्ये या ग्रेपफ्रूटची ५०० रोपे लावली होती. सोबतच साधी मोसंबीची ८०० रोपेही लावलेली आहेत. पाच एकरांत ही बाग उभी राहिली असून आता त्यातील फळे विक्रीला आली आहेत.
श्री. कदम यांनी काही वर्षांपूर्वी लोणी शिवारात ही शेती घेतली असून शेती हलक्या ते मध्यम प्रतीची असल्याने सपाटीकरणासाठी मोठा खर्च केला. शिवाय जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनाही केल्या. या व्यवस्थापनातून त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवत नाही. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी फळबाग लागवडीत उतरले.
ग्रेपफ्रूट हे फळ जीवनसत्व क चा मोठा स्रोत मानले जाते. विविध औषधी गुणधर्मही या फळात आहेत. त्यांनी ही सर्व बाग नैसर्गिक पद्धतीने उभी केली आहे. बागेला कुजवलेले शेणखत, कंपोस्ट, जीवामृत आदी विविध सेंद्रिय घटकांचा वापर ते करतात. यामुळे फळांचा दर्जा चांगला आहे. त्यांनी मोसंबी सोबतच लिंबू, सीताफळ, पेरू, आंब्याचीही लागवड केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.