Kalmmawadi Dam : काळम्मावाडी धरण कालवा अस्तरीकरणाला ६ महिन्यात तडे; महायुतीच्या प्रकाश आबिटकरांवर आरोप

K P Patil : नेमके कोणाच्या फायद्यासाठी व कशासाठी?’ असा खडा सवाल माजी आमदार के. पी. पाटील यांनी विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता केला.
Kalmmawadi Dam
Kalmmawadi Damagrowon
Published on
Updated on

Kolhapur Politics : ‘महाराष्ट्र व कर्नाटकातील जनतेची वरदायिनी असलेल्या काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न मागील दहा वर्षे ज्यांनी लोंबकळत ठेवला, त्यांनीच घाईगडबडीत धरणाशी संबंधित कालव्यांचे अस्तरीकरण निकृष्ट करण्यात धन्यता मानली. हे सारे नेमके कोणाच्या फायद्यासाठी व कशासाठी?’ असा खडा सवाल ठाकरे गटाचे उमेदवार के. पी. पाटील यांनी शिंदे गटातील प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता केला. शेळेवाडी (ता. राधानगरी) येथे बुधवारी (ता.०६) झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

पाटील म्हणाले, ‘काळम्मावाडी धरणामुळे लोकांना समृद्धीचे दिवस बघता आले. परंतु गेल्या दहा वर्षांत धरणाच्या गळतीबरोबरच कालव्यांच्या गळतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होण्याचा धोका निर्माण झाला होता. यासाठी गावोगावी निवेदने, आंदोलने, मोर्चे काढले; परंतु आमदार आबिटकर यांनी शासनाच्या तांत्रिक अडचणींची बाब पुढे करीत वर्षांनुवर्षे गळतीच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.

त्यानंतर मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अस्तरीकरणाचा घाट घातला आणि निकृष्ट दर्जाचे अस्तरीकरण जनतेच्या माथी मारले. परंतु हेच बूमरँग त्यांच्यावर उलटले असून अवघ्या सहा महिन्यांतच अस्तरीकरणाला तडे जाऊन पापुद्रे निघू लागले आहेत.’

Kalmmawadi Dam
Supriya Sule Kolhapur : सिंचन घोटाळा प्रकरण! सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले म्हणाले, ‘के. पी. पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला. त्यांनी त्याची कधी प्रसिद्धी केली नाही. बिद्री साखर कारखाना जसा राज्यात भारी चालविला, तसाच हा मतदारसंघसुद्धा त्यांच्या माध्यमातून राज्यात भारी ठरेल.’

भोगावती साखर कारखान्याचे संचालक धैर्यशील पाटील-कौलवकर, बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील, फिरोजखान पाटील, अशोक चौगले यांची भाषणे झाली. संचालक उमेश भोईटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संचालक राजू भाटळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनय पाटील, दीपक किल्लेदार, भगवान पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाना पाटील यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com