Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

Cooperative Department : राज्यातील सात साखर कारखान्यांनी अटीशर्ती पूर्ण न केल्यामुळे सहवीज निर्मिती अनुदान नाकारण्यात आले आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील सात साखर कारखान्यांनी अटीशर्ती पूर्ण न केल्यामुळे सहवीज निर्मिती अनुदान नाकारण्यात आले आहे. मात्र इतर ४१ पात्र कारखान्यांना अनुदानापोटी ११२ कोटी रुपये देण्यास सहकार विभागाने मान्यता दिली आहे.

बगॅस आधारित सहवीजनिर्मिती करणाऱ्या सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडून महावितरण वीज खरेदी करते. परंतु खरेदी दर परवडत नसल्यामुळे सहवीज निर्मिती तोट्यात चालत होती. त्यामुळे या कारखान्यांना अतिरिक्त अनुदान मिळण्यासाठी साखर उद्योगातून जोरदार पाठपुरावा केला गेला होता. त्यामुळे राज्य शासनाने या कारखान्यांना प्रतियुनिट दीड रुपया अनुदान देण्याचे घोषित केले. परंतु अनुदान पात्र कारखान्यांची नावे घोषित केली नव्हती.

Sugar Factory
Sugar Factory : वेळेत परवाने दिल्याने ३८ कारखान्यांची धुराडी पेटली

अनुदानासाठी ४८ कारखान्यांचे प्रस्ताव होते. मात्र त्यात सात प्रस्ताव अटीशर्तीत बसत नसल्याचे छाननी समितीने राज्य शासनाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे आता केवळ ४१ कारखान्यांना अनुदान मिळणार आहे.

विकलेल्या विजेपुरतेच अनुदान मिळणार

‘‘महावितरणसोबत २०१८ ते २०२३ या कालावधीत वीज खरेदी करार (ईपीए) करणाऱ्या कारखान्यांना मदत करावी, असे शासनाने सूचित केले आहे. त्यातही खरेदीचा करार प्रतियुनिट सहा रुपयांपेक्षा कमी दराने असलेल्या कारखान्यालाच दीड रुपया अनुदान द्यावे, असे शासनाने कळविले आहे.

तसेच २०२३-२४ या गाळप हंगामात महावितरणला विकलेल्या विजेपुरतेच अनुदान मिळणार आहे. या कालावधीत नेमकी किती वीज विकली याचे प्रमाणपत्र तपासण्यात आले. काही कारखान्यांनी वीज विकलीच नव्हती; त्यामुळे अशा कारखान्यांना अनुदानास अपात्र ठरविण्यात आले,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

Sugar Factory
Bidri Sugar Factory Kolhapur : ‘बिद्री’ साखर कारखाना बंद पाडण्याचा आबिटकरांकडून प्रयत्न

अनुदान पात्र कारखान्यांची नावे व अनुदानाच्या अंदाजे रकमा अशा : रेणा, लातूर (१.८३ कोटी रुपये), पराग, पुणे (१.७४ कोटी रुपये), क्रांतिअग्रणी, सांगली (२.३७ कोटी रुपये), ट्वेन्टिवन शुगर, नांदेड (६.०६ कोटी रुपये), माळेगाव युनिट १, पुणे (५.२९ कोटी रुपये), माळेगाव युनिट २, पुणे (२.४७ कोटी रुपये), श्रीपती, सांगली (१.७९ कोटी रुपये), रेणुका, कोल्हापूर (५.२१ कोटी रुपये),

सोमेश्वर, पुणे (६.३५ कोटी रुपये), विघ्नहर युनिट १, पुणे (१.७२ कोटी रुपये), भीमाशंकर युनिट १, पुणे (०.८२ कोटी रुपये), भीमाशंकर युनिट ३, पुणे (१.६२ कोटी रुपये), शरद, कोल्हापूर (१.४२ कोटी रुपये), मोहनराव शिंदे, सांगली (१.०२ कोटी रुपये), शाहू ससाका, कोल्हापूर (२.३१ कोटी रुपये), खटाव, सातारा (१.५२ कोटी रुपये), गंगाखेड,

परभणी (७.९५ कोटी रुपये), यशवंतराव मोहिते ससाका, सातारा (३.७८ कोटी रुपये), डॉ. बाबासाहेब आंबेडकर ससाका, धाराशिव (०.९७ कोटी रुपये), राजारामबापू पाटील, सांगली (१.९९ कोटी रुपये), बारामती अॅग्रो युनिट १, पुणे (३.८८ कोटी रुपये), जरंडेश्‍वर युनिट १, सातारा (३.९२ कोटी रुपये), जरंडेश्‍वर युनिट २, सातारा (४.४७ कोटी रुपये), बारामती अॅग्रो युनिट २, पुणे (०.७५ कोटी रुपये),

दूधगंगा, कोल्हापूर बारामती अॅग्रो युनिट १, पुणे (१.४४ कोटी रुपये), आयन शुगर, नंदुरबार (५.५१ कोटी रुपये), दत्त इंडिया, सातारा (३.७४ कोटी रुपये), घुले पाटील युनिट १, अहिल्यानगर (३.१६ कोटी रुपये), घुले पाटील युनिट २, अहिल्यानगर (३.१६ कोटी रुपये), शिवाजीराव नागवडे ससाका, अहिल्यानगर (२.८५ कोटी रुपये),

क्रांती, अहिल्यानगर (०.९० कोटी रुपये), पांडुरंग, सोलापूर (१.८८ कोटी रुपये), जवाहर युनिट १, कोल्हापूर (१.९३ कोटी रुपये), जवाहर युनिट १, कोल्हापूर (०.३१ कोटी रुपये), किसनवीर, सातारा (०.५९ कोटी रुपये), मुळा, अहिल्यानगर (३.५६ कोटी रुपये), आष्टी, सोलापूर (०.४४ कोटी रुपये), मानस, नागपूर (४.१७ कोटी रुपये), दौंड शुगर, पुणे (४.२६ कोटी रुपये), व्ही. पी. शुगर्स, सोलापूर (३.२७ कोटी रुपये) आणि पीयूष शुगर, अहिल्यानगर (०.३० कोटी रुपये).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com