Akola News: अकोट सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केल्याचे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने संबंधित ग्रेडरला तत्काळ कार्यमुक्त केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याची दखल विधिमंडळातही घेतली गेली..अकोट परिसरात सुरू असलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी माल घेऊन आल्यानंतर शासनाच्या ग्रेडरकडून प्रत्येक वाहनामागे ५,००० रुपये मागितले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. मंगळवारी (ता. ९) काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन या प्रकाराला विरोध केला. पैसे न दिल्यास वाहन ‘रिजेक्ट’ करण्याची धमकी दिली जात होती, ज्यामुळे अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता..Soybean Procurement Center: खरेदी केंद्रांचा ‘बाजार’ तेजीत.या प्रकाराची पुष्टी करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी पैसे मागितल्याचे चित्रीकरण केले आणि हे व्हिडिओ नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून संपूर्ण प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणले. शेतकऱ्यांच्या लुटिचा हा प्रयत्न असून, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीच्या संकटातून सावरल्यानंतर त्यांनी कष्टाने पिकविलेल्या सोयाबीनची योग्य दराने खरेदी करणे ही शासनाची जबाबदारी आहे. .Soybean Procurement Center : सोयाबीन खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडून पैसे मागणे अत्यंत गंभीर आणि अन्यायकारक असल्याचे आ. अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत सांगितले. या मुद्द्यावर विधानपरिषद सदस्य आ. मिटकरी यांनी आवाज उठवला. त्यांनी विधानपरिषदेतील पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनद्वारे हा प्रकार शासनाच्या निदर्शनास आणून दिला. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिटकरी यांनी केली. बुधवारी सभापतींना पत्रही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले..खरेदी सुरळीत सुरूग्रेडर ने पैसे मागितल्याची दखल घेत त्याला तेथून हटविण्यात आले आहे. यंदा हे ग्रेडरने खासगी एजंसी च्या माध्यमातून नेमण्यात आले आहेत. नवीन ग्रेडर नेमून खरेदी सुरू केल्याचे विदर्भ मार्केट फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.