NCP Protest : सरकारच्या कंत्राटी जीआरची राष्ट्रवादीकडून होळी; शरद पवार गटचे राज्यभरात आंदोलन

Contract JOB GR : राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काॅग्रेसच्यावतीने (शरद पवार गट) राज्यभरात आंदोलन करण्यात आले.
NCP protest
NCP protestAgrowon
Published on
Updated on

NCP Sharad Pawar Group : राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आजपासून राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस (शरद पवार गट) रस्त्यावर उतरला आहे. तर, राज्यभरात ठिकठिकाणी सरकारच्या कंत्राटी जीआरची होळी करून आंदोलन करण्यात आले.

NCP protest
Farmers Loan : कर्जमाफी योजना राबवूनही शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा कसा ? नागपूर खंडपीठाचा सरकारला सवाल

मुंबई, धुळे, नाशिक, नांदेड सह विविध जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या या आंदोलनात रिकाम्या खुर्च्यांवर कंत्राटी पंतप्रधान, कंत्राटी मुख्यमंत्री, कंत्राटी उपमुख्यमंत्री-1, कंत्राटी उपमुख्यमंत्री-2 अशा चिठ्या चिकटवू ठेऊन निदर्शने करण्यात आले. यावेळी कंत्राटी नोकर भरती शासन निर्णयाची होळी करत शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, "राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण या सरकारने ठेवले नाही. ही कृतीच मुळात असंवैधानिक आहे. त्याचबरोबर राज्यात लाखो तरुण बेरोजगार आहेत.

त्यांच्या हाताला काम मिळत नाही, म्हणून रिकामे बसलेले आहेत. त्यांना सरकार किमान हमी असणारी एक नोकरी देखील देऊ शकत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे या तरुणांची व महाराष्ट्रातील जनतेची ही फसवणूक आहे. महागाई, नापिकी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला कायम शासकीय नोकरी मिळाली तर शासनाला काय अडचण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com