सदस्यांच्या नावांमुळे अडले एमएसपी समितीचे काम

गेल्या महिन्यात तोमर यांनी लोकसभेतही समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती दिली होती. या समितीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी अर्थ शास्त्रज्ञांचाही समावेश असणार आहे.
MSP panel
MSP panelAgrowon
Published on
Updated on

किमान आधारभूत किमतीसाठी (MSP) समिती स्थापन करण्याबाबत केंद्र सरकार गंभीर आहे. मात्र शेतकरी संघटनांनीच अद्याप नावांची शिफारस केलेली नाही. केंद्र सरकारला या नावांच्या प्रतीक्षेत असल्याचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी म्हटले आहे.

MSP panel
पंजाबमध्ये ग्रामविकास कायद्यात सुधारणा

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान आधारभूत किंमतीसाठी (MSP) एक समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना या समितीसाठी २ ते ३ नावे सुचविण्याचा प्रस्ताव पाठवला होता. अद्याप शेतकरी संघटनांनी समितीसाठी आपल्या नावांची शिफारस केलेली नाही, केंद्र सरकारला या नावांची प्रतीक्षा असल्याचे तोमर म्हणाले आहेत.

MSP panel
कायदा होणार असला तरच एमएसपी समितीला अर्थ !

किमान आधारभूत किमतीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात येत आहे. याबाबत कुठलीही चालढकल करण्यात येणार नाही. शेतकरी संघटनांनी आपल्या प्रतिनिधींची नावे कळवली की लगेच या समितीचे कामकाज सुरु करण्यात येणार असल्याचे तोमर म्हणाले आहेत.

गेल्या महिन्यात तोमर यांनी लोकसभेतही समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती दिली होती. या समितीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी अर्थ शास्त्रज्ञांचाही समावेश असणार आहे.

MSP panel
केंद्र सरकारकडून भातपिकाची हमीभावाने खरेदी      

दरम्यान जोवर केंद्र सरकार या समितीचे स्वरूप स्पष्ट करत नाही तोवर अशा समितीवर शेतकरी संघटनांकडून आपले प्रतिनिधी नियुक्त केले जाणार नसल्याचे संयुक्त किसान मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या समितीचे स्वरूप काय? समितीला वैधानिक दर्जा आहे का? समितीचा अध्यक्ष आणि इतर सदस्य कोण असणार ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या समितीच्या शिफारशी सरकारसाठी बंधनकारक असणार आहेत का? या गोष्टी स्पष्ट झाल्याशिवाय समितीसाठी नावे सुचवण्यात येणार नसल्याचे संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com