Sharad Pawar : ...तर आपल्या जमिनी क्षारपड होतील; शरद पवार यांचा सरकारला टोला

Sharad Pawar Sangli News : शरद पवार यांनी राज्य सरकारच्या शेती, पाणी, मोफत वीज योजनेवर जोरदार निशाना साधताना टीका केली. तसेच शेतकऱ्यांना सल्ला देताना कान टोचले आहेत. 
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News :  राज्यात विधानसभेची निवडणूक काहीच महिन्यांवर आली आहे. याआधी राज्यातील महायुती सरकारने पावसाळी अधिवेशात अंतरिम अर्थसंकल्पातून विविध योजना आणि घोषणांचा पाऊस पाडला. त्यावरून विरोधकांनी टीका केल्या आहेत.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील टीका केली होती. त्यानंतर सोमवारी (ता. ०८) पुन्हा एकदा शरद पवार यांनी सांगलीत राज्य सरकारच्या शेती, पाणी, मोफत वीज योजनेवर जोरदार निशाना साधत टीका केली.

सरकारने वीज फुकट देणार असल्याने आता कृषी पंप बंद करायला कोण जाणार? असा सवाल केला आहे. तसेच आपल्या बापजाद्यांच्या शेत जमिनी क्षारपड होतील असा टोला सरकारला टगावला आहे.

तर यावेळी शेतकऱ्यांना पवारांनी सल्लाही दिला आहे. ते तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे क्षारपड जमीन निर्मूलन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आ. सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, मी काही बोललो की शेतकरी नराज होतात. पण ऊस आळसी पीक असून एकदा लावले की कारखान्याला पाठवताच त्याकडे पाहिले जाते. तर एरवी पारावर बसून जगाच्या आणि राजकारणावर गप्पा मारल्या जातात. त्यामुळेच जमिनीचा पोत बिघडतो, ती क्षारपड होते.

Sharad Pawar
Sharad Pawar : जगभरातून द्राक्षाच्या नव्या जाती आणण्याकडे लक्ष द्यावे

आता तर राज्य सरकारने शेतीला मोफत वीज योजना दिली आहे. त्यामुळे एकदा कृषी पंप सुरू केला की कोण जाणार बंद करायाला. यामुळे आपल्या बापजाद्यांची असणारी जमीन क्षारपड होईल.

भविष्यात आपल्या जमिनी वाचवायला हव्यात. आपल्या पुढल्या पिढ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करायचं नसेल तर सरकारच्या योजनांचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन शरद पवारांनी शेतकऱ्यांना केले.

तसेच दुष्काळावर आपण विचार करायला हवा. पाण्याचा वापर करताना योग्य विचार व्हायला हवा असेही पवार म्हणाले. तर उसाची लागवड केल्यानंतर २० टक्क्यांचे उत्पादन ६५ टक्क्यांवर गेले. मात्र आपण दुष्परिणामांचा विचार केला नाही. शेतातील पाण्याच्या निचऱ्याकडे लक्ष दिले नाही. आता याकडे लक्ष द्यायला हवे. 

तसेच पाण्याचा अतिवापर टाळण्यासह जमिनी क्षारपड होणार नाहीत याची काळजी घेताना पाण्याच्या वापराबाबत शपथ घेतली पाहीजे. तरच पुढची पिढी टिकेल, असंही मतं शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com