
Crop Loss Relief : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या लांबल्या असल्यातरी त्याची चिंता करू नये. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे. यंदाच्या (२०२३) मार्च-एप्रिल मधील अवेळी पाऊस व गारपिटीने शेतीपिकांच्या नुकसानीपोटी साडेचार हजार बाधित शेतकऱ्यांना ३ कोटी १२ लाखांहून अधिक मदत वितरित करण्यात आली.
नैसर्गिक आपत्तीमुळे मयत व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून ९ प्रकरणांत ३६ लाख रुपये, तसेच ३७ पशुधन मालकांना १४ लाख रुपये मदत दिली, असे माहिती गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते. खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, मेघना बोर्डीकर -साकोरे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे आदी उपस्थित होते.
सावे म्हणाले, की गतवर्षी (२०२२)च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमधील सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० कोटी ५६ लाख रुपये वितरित केले. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत ७ लाख ६१ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देत असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच अर्थसंकल्पामध्ये केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये अनुदान मिळणार आहेत. या योजनेचा जिल्ह्यातील सुमारे २ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सावे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.