Suspension Nana Patole: सरकार शेतकरीविरोधी; पटोले यांच्या निलंबनावरून विरोधकांची टिका

Assembly Suspension Issue: राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी प्रश्नावरून विधानसभेत गोंधळ उडाला असून काँग्रेस नेते नाना पटोले यांना निलंबित करण्यात आले. विरोधकांनी ही कारवाई लोकशाहीविरोधी असल्याचे सांगून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Jitendra Awhad, Nana Patole, Rohit Pawar
Jitendra Awhad, Nana Patole, Rohit PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी (ता.१) काँग्रेस नेते नाना पटोले यांना विधानसभेतून एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर पटोले यांनी सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला. तर विरोधकांनी सरकारवर टिका केली.

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अध्यक्षांच्या आसनापर्यंत जाण्याची ही पहिली वेळ नाही. जे सत्ताधारी आहेत, ते विरोधी पक्षात असताना अनेकदा अध्यक्षांच्या आसनापर्यंत जाऊन गोंधळ घालायचे. त्याच्या तुलनेत नाना पटोले हे एकटे आणि दूर होते. याआधी अध्यक्षांना झुंडीनं घेरतानाही पाहिलं आहे.

Jitendra Awhad, Nana Patole, Rohit Pawar
Nana Patole suspension : कॉँग्रेसचे आमदार नाना पटोलेंचं एक दिवसासाठी निलंबन; शेतकऱ्यांच्या अपमानावरून विधानसभेत गोंधळ

जर सत्ताधारी पक्षाने नियोजनपूर्वक पटोलेंना बाहेर काढण्याचा डाव आखला असेल, तर तो आम्हाला मान्य नाही. आज लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवले जात आहेत. नाना पटोलेंना जे अधिकार आहेत, ते लोकशाहीने दिले आहेत. त्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला असेल, तर आम्ही त्याला पूर्ण समर्थन देतो.” असं आव्हाड म्हणाले.

तसेच रोहित पवार यांनी विधानभवनाबाहेर बोलताना तत्कालीन सरकारवर ‘गजनी सरकार’ आणि ‘विसरभोळा कारभार’ अशी टीका केली. ते म्हणाले, “सातबारा कोरा करू अशी घोषणा केली गेली, पण ती फक्त घोषणाच राहिली. भावांतर योजना, कर्जमाफी, पिकविमा या सगळ्या बाबतीत सरकारने कुठलीही ठोस कृती केलेली नाही. मुख्यमंत्री बिहारला गेले असताना मोदींनी केलेल्या घोषणांचा काहीही ठसा अद्याप सरकारकडून मिळालेला नाही. त्यामुळे या सरकारवर शेतकरी विश्वास ठेवायला तयार नाही.

Jitendra Awhad, Nana Patole, Rohit Pawar
Political Controversial Rhetoric: बालिश बहु बडबडला

विधानसभा अध्यक्षांवर धावून गेल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर पटोले यांनी त्यांची भूमिका मांडली. पटोले म्हणाले, “जर सरकारमध्ये थोडी तरी धमक असती, तर त्यांनी स्वतःच्या कृषीमंत्री आणि आमदारांवर कारवाई केली असती. मुख्यमंत्री म्हणतात की मी अध्यक्षांच्या आसनाजवळ गेलो आणि धमकावलं.  हे त्यांनी रेकॉर्डवर आणलं आहे.

मी स्वतः विधानसभा अध्यक्ष राहिलो आहे, मला नियम माहिती आहेत. जेव्हा सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतं, तेव्हा विरोधकांनी कठोर भूमिका घ्यावीच लागते. मी शेतकरी आहे, आणि माझ्या शेतकऱ्यांचा अपमान मी कधीही सहन करणार नाही. आमचा पक्षही हे सहन करणार नाही.” असंही नाना पटोले म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com