Tur
TurAgrowon

Tur Procurement: तूर खरेदीला सरकारकडून २८ मेपर्यंत मुदतवाढ

Government Extension: राज्य सरकारने तूर खरेदीसाठी १३ मेची मुदत २८ मेपर्यंत वाढवली आहे. यंदा २ लाख ९७ हजार टन तूर खरेदीचे उद्दिष्ट असून २३ मेपर्यंत फक्त ३७ टक्के पूर्ण झाले आहेत.
Published on

Pune News: राज्यातील तूर खरेदीला सरकारने २८ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यात यंदा २ लाख ९७ हजार टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु २३ मेपर्यंत केवळ ३७ टक्के उद्दिष्ट साध्य झाले. राज्यात १ लाख १० हजार टन तूर खरेदी झाली. तूर खरेदीसाठी आणखी पाच दिवस मिळणार असले तरी त्यामध्ये खरेदीच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, असे खरेदी प्रक्रियेत असलेल्या पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्राने राज्याला चालू हंगामात २ लाख ९७ हजार टन तूर खरेदीला मंजुरी दिली. तूर खरेदीसाठी नाफेड व एनसीसीएफने ७६४ खरेदी केंद्र सुरू केली होती. केंद्राच्या नियमानुसार ९० दिवस खरेदी चालली.

Tur
Tur Procurement : हमीभावाने १७ हजार ७९८ क्विंटल तूर खरेदी

१३ मे २०२५ पर्यंत तूर खरेदीची मुदत होती. या मुदतीत सरकारला हमीभावाने तूर विकण्यासाठी १ लाख ३७ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तूर खरेदीची मुदत संपल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर शिल्लक होती. त्यामुळे सरकारने २८ मे २०२५ पर्यंत तूर खेरदीला मुदतवाढ दिली आहे.

Tur
Tur Procurement : हमीभावाने १७ हजार ७९८ क्विंटल तूर खरेदी

तूर खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. राज्यात २३ मेपर्यंत उद्दिष्टाच्या केवळ ३७ टक्के तूर खरेदी झाली. त्याला सरकारचे धोरणच जबाबदार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. केंद्र सरकारने यंदा तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला. नव्या तुरीची बाजारात आवक वाढल्यानंतर दर हमीभावापेक्षा कमी होते. तेव्हा बाजारात सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार भाव होता.

मात्र या काळात सरकारची खरेदी सुरूच नव्हती. सरकारची खरेदी सुरू झाली तेव्हा मात्र दराने ७ हजारांचा टप्पा पार केला होता. मागील काही दिवसांपासून दर पुन्हा ७ हजारांच्या खाली आले आहेत. शुक्रवारी (ता.२३) राज्यातील बहुतांशी बाजारात तूर ६ हजार ६०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान विकली गेली. आता तूर खरेदीला मुदतवाढ मिळाली असली तरी पावसाचे वातावरण आणि बहुतांशी शेतकऱ्यांकडे आता माल शिल्लक नसल्यामुळे मुदतवाढीच्या काळात तूर खरेदी कमीच राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com