Nano Fertilizer : नॅनो खतांच्या वापरावर सरकारचा भर; १० प्लांटच्या माध्यमातून वाढवणार उत्पादन

Nano Urea : शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये नॅनो खतांचा अधिकाधिक वापर वाढवा, यासाठी केंद्राद्वारे राज्यस्तरावर प्रोत्साहन आणि जनजागृती अभियान राबविले जात आहेत.
Nano Fertilizer
Nano FertilizerAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र सरकार नॅनो खतांच्या वापरावर भर देत आहे. शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये नॅनो खतांचा अधिकाधिक वापर वाढवा, यासाठी केंद्राद्वारे राज्यस्तरावर प्रोत्साहन आणि जनजागृती अभियान राबविले जात आहेत. नॅनो खतांच्या वापराला चालना देण्यासाठी सरकार देशातील १० नॅनो खत प्रकल्पांमधून उत्पादन वाढविण्याच्या तयारीत आहे.

१० नॅनो खत प्रकल्प

केंद्रीय खते आणि रसायन मंत्रायाच्या म्हणण्यानुसार, भारत सरकार शेतकऱ्यांना नॅनो खतांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी देशातील एकूण १० नॅनो खत उत्पादन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यापैकी ६ प्रकल्पांतून नॅनो युरिया आणि ४ प्रकल्पांतून नॅनो डीएपी खतांचे उत्पादन होते.

Nano Fertilizer
Nano Urea and Nano DAP fertilizers : वित्त विभागाच्या अभिप्रायानंतरच नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीचा प्रस्ताव ; मुख्यमंत्री शिंदे यांचे स्पष्टीकरण

३७ कोटी बाटल्या उत्पादनाची क्षमता

नॅनो खत उत्पादनासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पांची वर्षाला ५०० मिली आणि १००० मिली ३७ कोटी बाटल्यांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे.

Nano Fertilizer
Nano DAP : नॅनो डीएपी, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेल्या १०९ हवामान अनुकूल पिकांच्या वाणांचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पिकांची उत्पादकता आणि उत्पादन खर्च कमी करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून नॅनो खत प्रकल्पांमधून उत्पादन वाढविण्याची सरकारची योजना आहे.

शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता

नॅनो खतांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असल्याचा दावा केंद्रीय मंत्रालयाने केला आहे. यासाठी देशात नॅनो युरियाचे उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने खत विभागाने नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) यांना उत्पादन वाढविण्यासाठी आणि नॅनो युरिया प्रकल्प स्थापन करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com