Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

Agriculture Irrigation : गोसेखुर्द कालव्याच्या घोडाझरी वितरिकेचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडल्याने शेतकरी सिंचन सुविधांपासून वंचित आहेत.
Canal
Canal Agrowon
Published on
Updated on

Chandrapur News : गोसेखुर्द कालव्याच्या घोडाझरी वितरिकेचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडल्याने शेतकरी सिंचन सुविधांपासून वंचित आहेत. परिणामी हरितक्रांतीची त्यांची प्रतीक्षा कायम असल्याने हे काम मार्गी लावावे अशी मागणी आहे.

नवरगाव परिसरात एकमेव धानाचे पीक घेतले जाते. सिंचनाच्या सोयी सुविधांचा अभाव असल्याने इच्छा असतानाही दुबार किंवा व्यवसायिक तसेच पर्यायी पीक घेणे शेतकऱ्यांना शक्‍य होत नाही. या परिसरात सिंचन सोयींचा अभाव असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रिटीशांनी तयार कलेल्या घोडाझरी या तलावातील पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून राहावे लागते.

Canal
Canal Work : पावसाळ्यापूर्वी कालव्याचे काम पूर्ण करा

मात्र या कालव्याच्या नुसत्या देखभाल, दुरुस्तीकडे देखील अधिकारी व शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळेच कालव्याला विविध ठिकाणी भेगा पडल्या असून दरवर्षी तो फुटून पाणी व्यर्थ वाहून जाते. त्यामुळे तलावात पाणी असले तरी ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत नाही.

Canal
Canal Work Hunger Strike : कालव्याच्या कामाच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे

परिणामी दरवर्षी पाण्याअभावी पिक करपण्याची वेळ येते. त्यामुळेच गोसेखुर्द प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे शेतकऱ्याच्या नजरा खिळून आहेत. गोसेखुर्द कालव्याच्या घोडाझरी वितरिकेच्या बांधकामाची १५ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. त्याकरिता नवरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील घेण्यात आल्या. परंतु हे काम १५ वर्षांत अपेक्षित प्रमाणात पुढे सरकले नाही.

वन्यप्राणी कालव्यात पडण्याची भीती

या परिसरात जंगल असून वन्यप्राण्यांचा वावर आहे. काही ठिकाणी तर ओपन तर काही ठिकाणी अंडरग्राऊंड कालव्याचे काम सुरू आहे. या कालव्यात चुकून वन्यप्राणी पडल्यास त्याला बाहेर पडण्याची कोणतीच व्यवस्था नाही. परिणामी कालवा क्षेत्रात विशिष्ट अंतरावर पायऱ्याचे बांधकाम व्हावे, अशी देखील मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com