Farmers Protest : दिल्लीवर कूच करण्यासाठी शेतकरी तयारी सुरू!

Delhi Farmers Protest : शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील चौथ्या बैठक निष्फळ झाली. शेतकऱ्यांनी सरकारचा हमीभावचा प्रस्ताव नाकारला आहेत. तसेच आज बुधवार (ता.२१) दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारची डोके दुखी वाढली असून दिल्ली सिमेवर बॅरेगेंटिंग, रस्त्यावर खिळे, सिमेंटच्या भिंत, मोठा फौजफाट्यासह ३० हजार अश्रुधुराचे गोळे तयार ठेवण्यात आले आहेत.
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon
Published on
Updated on

Pune News : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एमएसपीच्या कायद्यासाठी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चौथ्या फेरीत देखील कोणताच तोडगा निघाला नाही.  यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार करताना बुधवारी (ता.२१) सकाळी ११ वाजता 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे.

शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलीस आणि प्रशासन अलर्टमोडवर आले असून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सरकारने शेतकऱ्यांना अडविण्यासाठी बॅरिकेड्स, सिमेंटच्या भिंत आणि रस्त्यावर खिळे मारले आहेत. ते हटवण्यासाठी शेतकऱ्यांना देखील जेसीबी आणि इतर यंत्रांची जुळवाजूळव सुरू केली आहे.

पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’ नारा

हमीभावासाठी कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यासह शेतकऱ्यांनी पेन्शन या प्रमुख मागण्यांसाठी उत्तरेकडील राज्यांतील अराजकीय शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकरले आहे. त्यावर शेतकऱ्यांचे प्रतिनीधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत.

चौथ्या फेरीत सरकारकडून डाळी, मका आणि कापूस या पिकांची एमएसपीच्या किंमतींवर पाच वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी करण्याच्या प्रस्ताव ठेवला होता. होता. तो संघटनांनी नाकारल्याने अद्यापही कोणताही ठोस तोडगा आंदोलनावर निघालेला नाही. यानंतर आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’ नारा दिला आहे. 

Farmers Protest
Farmer Protest: शंभू सीमेवरून शेतकरी करणार दिल्लीकडे कूच!

पोलीस आणि प्रशासन अलर्टवर 

शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’ नारा दिल्याने पोलीस आणि प्रशासन अलर्टमोडवर आले आहे. पोलीस आणि प्रशासनाने दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाजीपूर सीमेवर अतिरिक्त सुरक्षा वाढवली आहे. तसेच पंजाब-हरियाणा सीमा आणि दिल्लीला जाणारे पर्यायी मार्ग सील करण्यात आले आहेत.

बॅरिकेड्स, सिमेंटच्या भिंत आणि रस्त्यावर खिळे 

दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे. तर आज सकाळी ११ वाजेपासून दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. यावरून सरकारने शेतकऱ्यांना अडविण्यासाठी बॅरिकेड्स, सिमेंटच्या भिंत आणि रस्त्यावर खिळे ठोकले आहेत. तर ते हटवण्यासाठी शेतकऱ्यांना देखील जेसीबी आणि इतर यंत्रांची जुळवाजूळव सुरू केली आहे.

सीमेवर निमलष्करी दल

तसेच शेतकऱ्यांना दिल्लीच्या सिमेवरच रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यासाठी तारांचे कुंपन घातले आहे. त्याचबरोबर दिल्ली-हरियाणा सीमेवर निमलष्करी दलांव्यतिरिक्त दिल्ली पोलिसांचे कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त जिमी चिराम यांनी दिली आहे.

यावेळी त्यांनी, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांचा चोख बंदोबस्त असून निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी ३० हजार अश्रुधुराचे गोळे देखील मागवले आहेत. तर वाहणांची कसून तपासणी केली जात आहे.  

Farmers Protest
Farmer Protest Delhi: २१ फेब्रुवारीला आंदोलक शेतकरी दिल्लीकडे कूच करणार; बॅरीकेड्समधून मार्ग काढण्यासाठी सीमेवर शेतकऱ्यांनी उतरवले जेसीबी!

हरियाणामध्ये शेतकऱ्यांची धरपकड

काल मंगळवारी दिल्लीला जाणाऱ्या हरियाणातील सुमारे ५० शेतकऱ्यांची धरपकड पोलिसांनी केली. त्यांना गुरुग्राम पोलिसांनी मानेसरमध्ये ताब्यात घेतलं. तर हे शेतकरी राज्य सरकारविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले होते. तर या शेतकऱ्यांनी सरकारने मानेसरमधील पाच गावांतील १८१०  एकर शेतजमिनी संपादित केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याचा योग्य मोबदलाही दिला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल 

यावेळी शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी, दिल्ली कूचवरून आपली प्रतिक्रिया दिली. त म्हणाले, आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अराजकता निर्माण करण्याचा नाही. आम्हाला फक्त दिल्लीला जायचं आहे. पण सरकार म्हणते आम्हाला पुरेसा वेळ मिळाला नाही. याचा अर्थ सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करायचे आहे. 

आम्हाला रोखण्यासाठी एवढे मोठे बॅरिकेड्स लावणे हे योग्य आहे का? आम्हाला शांततेने दिल्लीला जायचे आहे, सरकारने बॅरिकेड्स काढून आम्हाला आत येऊ द्यावे. नाहीतर आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आम्ही शांत आहोत, त्यांनी हात पुढे केला तर आम्हीही सहकार्य करू. तसेच धीर धरा,  नियंत्रण गमावू नका असेही आवाहन त्यांनी तरुणांना केले आहे.

शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर 

यावरून शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही बैठकांना उपस्थित राहिलो, प्रत्येक मुद्यावर चर्चा झाली आणि आता निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे. पंतप्रधानांनी पुढे येऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात. १.५ - २ लाख कोटी रुपये ही रक्कम सरकारसाठी फार मोठी नाही. हे अडथळे दूर करून आम्हाला दिल्लीकडे कूच करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी पंढेर यांनी केली आहे. 

तसेच हरियाणातील गावागावात निमलष्करी दल तैनात आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे? आम्ही तुम्हाला पंतप्रधान केले आहे. पण सैन्य आमच्यावर असे अत्याचार करेल असे आम्ही कधीच विचार केला नाही. कृपया संविधानाचे रक्षण करा आणि आम्हाला शांततेने दिल्लीकडे जाऊ द्या, हा आमचा अधिकार आहे, असे पंढेर यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com