Sant Tukaram Maharaj Palkhi: अकलूजमध्ये पार पडले गोल रिंगण

Akluj Event: जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराटी येथून मंगळवारी (ता.१) सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
Gol Ringan
Gol RinganAgrowon
Published on
Updated on

Solapur News: जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराटी येथून मंगळवारी (ता.१) सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक गोल रिंगण पार पडले, या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे जणू पारणे फिटले.

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उपविभागीय अधिकारी अमित माळी, श्रीमती विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.

Gol Ringan
Ashadhi Wari 2025 : महिला शेतकऱ्यांकडून वारकऱ्यांना पुरणपोळीचे गोड जेवण

हाती पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहेत. नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.३५ वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले.

Gol Ringan
Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बेलवाडीत रंगले पहिले अश्‍व रिंगण

या वेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पोलिस विभागाच्या बॅण्ड पथकानेही पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम महाराजांच्या अश्‍व आणि पादुकांचे पूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला.

जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष आणि रिंगणात एकापाठोपाठ एक धावणाऱ्या महिला वारकरी, टाळकरी, वीणेकरींनी सर्वांचेच लक्ष वेधले. त्यानंतर अश्‍वाने रिंगण पूर्ण केले. अश्‍वाचा हा धावा पाहण्याचा क्षण डोळ्यात साठवणे, ही जणू एक पर्वणीच होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com