Goat Farming Training : कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेळीपालन प्रशिक्षण

Agricultural Science Center : सर्वांगीण ग्रामीण विकास अंतर्गत शेळीपालन प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. प्रशांत भोसले होते.
Goat Farming Training
Goat Farming TrainingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी कृषी विज्ञान केंद्रातर्फे सोमवार (ता. २३) ते गुरुवार (ता. २६) या कालावधीत शेळीपालन प्रशिक्षण घेण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र, एचडीएफसी बँक (सीएसआर) आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने परिवर्तन सर्वांगीण ग्रामीण विकास अंतर्गत शेळीपालन प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. प्रशांत भोसले होते.

Goat Farming Training
Natural Farming Training : महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती प्रशिक्षण

उद्‌घाटन प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बालासाहेब झिंजार्डे होते. रमेश बादाडे, विशाल देशमुख, पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुपोषण शास्त्र विभाग डॉ. एस. एम. वानखेडे, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. ए. खान, कृषी विज्ञान केंद्राचे पशुविज्ञान विशेषज्ञ डॉ. इम्रान खान आगाई, पीकशास्त्र विशेषज्ज्ञ सवाई सिंह निठारवाल, गृहविज्ञान विशेषज्ञ डॉ. अरुणा खरवडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सय्यद मोहसीन आदी उपस्थित होते.

Goat Farming Training
Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

झिंझार्डे म्हणाले, की कृषिपूरक शेळीपालन लहान शेतकरी सुद्धा सुरू करुन रोजगार निर्मिती करू शकतो. डॉ. खान यांनी शेळ्यांच्या विविध जाती, शेळ्यांची निवड, शेळीपालनाचे प्रकार तसेच शेळ्यांचे गोठा व्यवस्थापनावर माहिती दिली.

डॉ. वानखेडे यांनी शेळ्यांचे आहार व्यवस्थापनात सुका चारा, हिरवा चारा आणि भरडा यांचे संतुलित आहार, करडे, गाभन शेळ्यांना तसेच लागवडीसाठीच्या बाकडाचे अतिरिक्त आहार व्यवस्थापनावर तर डॉ. इम्रान खान आगाई यांनी शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापनात शेळ्यांचे विविध आजार, समस्या आणि उपचार, लसीकरणाबद्दल मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com