Go Green Yojana : एक लाख वीजग्राहकांना ‘गो ग्रीन’ योजनेचा लाभ

MAHAVITARAN : ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजने अंतर्गत पुणे परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली आहे.
MSEDCL
MSEDCLAgrowon

Pune News : ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजने अंतर्गत पुणे परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली आहे. या योजनेत १ लाख वीजग्राहकांनी सहभाग घेऊन तब्बल एक कोटी २० लाख ८४० रुपयांची वार्षिक बचत केली आहे.

वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या पुणे परिमंडलातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी एक लाखाचा टप्पा गाठला आहे.

गेल्या फेब्रुवारीपासून या योजनेमध्ये ७ हजार १९४ वीजग्राहकांची भर पडली आहे. राज्यात ३ लाख ८७ हजार ७५७ वीजग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक १ लाख ७ वीज ग्राहकांचा सहभाग आहे.

MSEDCL
Agriculture Electricity : शेतीसाठी दहा तास मोफत वीज देण्याचा निर्णय लवकरच

दरम्यान, या योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होते.

वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते 'गो ग्रीन'मधील ग्राहकांना 'ई- मेल द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच 'एसएमएस द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे.

MSEDCL
Electricity News : खंडित विजेला फोर्स लोडशेडिंगचे जोड

पिंपरीत, सांगवी उपविभाग वरचढ

पिंपरी चिंचवड शहरात 'गो ग्रीन मध्ये २९ हजार २०५ वीजग्राहक सहभागी झाले आहेत. यामध्ये सांगवी उपविभागातील सर्वाधिक ९ हजार ४२, चिंचवड ५ हजार ६६१ आणि आकुर्डीतील ५ हजार ५२५ ग्राहक सहभागी आहेत.

पुणे ग्रामीण मंडला अंतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यांत १७ हजार ५२९ ग्राहकांनी ‘गो ग्रीन’मध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये हडपसर ग्रामीण उपविभागातील ४ हजार ७१२ वीजग्राहक आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com