
Chhatrapati SambhajiNagar News : ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. या निमित्ताने मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती देण्याचा संकल्प सरकारसह आपणही करूयात,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभाजवळ रविवारी (ता. १७) आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार, खासदार, प्रमुख प्रशासकीय अधिकारी पस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, ‘‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसंग्रामींचे स्मरण क्रमप्राप्त आहे. यानिमित्ताने विकासाचे नवे पर्व सुरू करूयात. तेलंगाणातही मुक्तिसंग्राम दिन साजरा होतोय. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आपण प्रत्येक जिल्ह्याला २ कोटी रुपये दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मृती स्मारक बांधण्यासाठी १०० कोटी देत आहोत.
गतवर्षी पहिल्यांदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन करताना आपण काही घोषणा केल्या होत्या. त्या कागदावर ठेवल्या नाही तर प्रत्यक्षात उतरविल्या. रस्त्यासाठी शेकडो कोटींचा निधी दिला आहे. उर्वरित रस्तेही पूर्ण केले जातील. उद्योग, कृषी, शिक्षण, आरोग्य यासह सर्वच क्षेत्रात मराठवाड्याच्या विकासाचा कालबद्ध कार्यक्रम आपण हाती घेतो आहोत,’’ असे श्री. शिंदे म्हणाले.
सिद्धार्थ उद्यानात जन्मलेल्या वाघिणीच्या बछड्यांचे नामकरण अनुक्रमे श्रावणी, विक्रम, व कान्हा असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्वातंत्र्यसैनिकांसह निमंत्रितांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी
‘‘नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील. मराठवाड्याला अग्रेसर करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.