Water Protest Maharashtra : ‘लबाडांनो, पाणी द्या’ आंदोलनांतर्गत उद्या हल्लाबोल महामोर्चा

Amabadas Danve : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शहरातील पाणीटंचाईच्या ज्वलंत प्रश्‍नाला हात घालत ‘लबाडांनो, पाणी द्या’ आंदोलन उभे केले.
Ambadas Danve
Ambadas Danve Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambahajinagar News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शहरातील पाणीटंचाईच्या ज्वलंत प्रश्‍नाला हात घालत ‘लबाडांनो, पाणी द्या’ आंदोलन उभे केले. १३ एप्रिलपासून सुरू झालेले या आंदोलनांतर्गत शुक्रवारी (ता. १६) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक ते गुलमंडी दरम्यान हल्लाबोल महामोर्चा होईल असे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावतीने सांगण्यात आले.

माहितीनुसार श्री. दानवे यांनी ९ ते १२ मे या चार दिवसांत ‘‘हल्लाबोल पदयात्रा’’ काढली. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत या पदयात्रेत त्यांनी ४५ किलोमीटर चालत शहरातील ९० वॉर्डांमधील प्रत्येक गल्ली-नाक्यावर पोहोचून नागरिकांशी संवाद साधला. पाणीपुरवठ्याच्या तांत्रिक अडचणी, सरकारी नाकर्तेपणा आणि स्थानिक समस्यांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली.

त्यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी सुमारे ७ लाख नागरिकांपर्यंत आंदोलनाचा संदेश पोहोचवल्याचा दावा केला आहे.पदयात्रेत सातारा, चिकलठाण, हर्सूलसारख्या पाणीटंचाईने होरपळलेल्या भागांमध्ये महिलांनी रिकामे हंडे हातात घेऊन रस्त्यावर उतरत आपला संताप व्यक्त केला.

Ambadas Danve
Khandesh Water Crisis : खानदेशात प्रकल्पांतील जलसाठा २८ टक्क्यांखाली

श्री दानवे आणि शिवसैनिकांचे औक्षण करत महिलांनी “लबाडांनो पाणी द्या” या आंदोलनाला पाठिंबा दिला. अनेक ठिकाणी महिलांनी आपल्या दैनंदिन संघर्षाच्या कहाण्या सांगितल्या. शेकडो तक्रारींची निवेदने नागरिकांनी दिली. त्यामधून पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘‘लबाडांनो पाणी द्या’’ आंदोलनाने संभाजीनगरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय बदल घडविल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. श्री. दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सरकारवर दबाव टाकत पाणीपुरवठा प्रकल्पाच्या प्रगतीकडे लक्ष वेधले. तरीही, पूर्ण समाधानासाठी लढा सुरूच राहणार आहे, असे श्री. दानवे यांनी स्पष्ट केले.

Ambadas Danve
Mhaisal Water Crisis : ‘उटगी, निगडी तलावांत ‘म्हैसाळ’चे पाणी सोडा’

माहितीनूसार पदयात्रेदरम्यान श्री. दानवे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात १,६८० कोटींना मंजूर झालेली योजना सध्याच्या भाजप सरकारच्या काळात २,७४० कोटींवर गेली. ‘‘हा १,०६० कोटींचा मलिदा कोणाच्या घशात गेला?’’ असा सवाल उपस्थित करत सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर हल्लाबोल केला.

आंदोलनाच्या दणक्यामुळे संभाजीनगर विभागीय आयुक्त यांनी जायकवाडी धरणापासून शहरात पाणी आणणाऱ्या पाइपलाइन प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प २०० एमएलडी पाणी पुरवण्यासाठी आहे. आयुक्तांनी प्रकल्पाची नियमित तपासणी आणि लवकर पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले.

हा सरकारी प्रतिसाद दानवे यांच्या आंदोलनाच्या यशाचा पुरावा असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जाते. पाणीपुरवठ्यात सुधारणा झाल्याचा तसेच पूर्ण समाधानासाठी लढा कायम असल्याचा दावाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com