Rural Water Mapping: ‘जलवीरांकडून’ जलस्रोतांचे ‘जिओ-टॅगिंग’

Geo Tagging in Water Sources: साताऱ्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी पारंपरिक जलस्रोतांचे जिओ-टॅगिंग करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. हा उपक्रम हवामान बदलाच्या संकटाशी सामना करण्यासाठी दीर्घकालीन जलनीतीची पायाभरणी ठरत आहे.
Geo Tagging
Geo TaggingAgrowon
Published on
Updated on

Pune News: गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचा परिणाम पीक उत्पादनांच्या बरोबरीने भूजल साठ्यावरही दिसू लागला आहे. आजही ग्रामीण भागात काही प्रमाणात पारंपरिक जलस्रोत म्हणजेच डोंगर दऱ्यातील झरे, शेत-शिवारातील जुने आड, विहिरी टिकून आहेत. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता या दुर्लक्षित जलस्रोतांची नोंद तसेच संवर्धनासाठी शालेय विद्यार्थांनी ‘जिओ टॅगिंग’ करण्यास सुरुवात केली आहे.

सातारा जिल्ह्यातील तांदूळवाडी, मंगळापूर आणि चंचळी (ता. कोरेगाव) गावामध्ये ‘युनेप’चे माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन तेर फाउंडेशन आणि श्री चौंडेश्वरी शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमास मे महिन्यात सुरुवात झाली होती.

Geo Tagging
School Geo Tagging : सातारा जिल्ह्यातील शाळांचे होणार जिओ टॅगिंग

याबाबत डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले, की आम्ही पहिल्या टप्प्यात मे महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर शालेय विद्यार्थांच्या मदतीने सातारा जिल्ह्यातील तांदुळवाडी, मंगळापूर, चंचळी गावशिवारातील पारंपरिक जलस्रोतांचे डिजिटलीकरण आणि नकाशांकन (जिओ टॅगिंग) करण्याचा प्रकल्प हाती घेतला. पारंपरिक ज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा संगम आहे.

या अंतर्गत उपग्रहआधारित मॅपिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे विश्लेषणकरून आड, विहीर, कूपनलिका, झरे हे जलस्रोत तसेच हिरडा, बेहडा, पळस, अर्जुन, वड, पिंपळासारख्या स्थानिक वृक्षांचे निरीक्षण, दस्तऐवजीकरण तसेच संवर्धनाचे नियोजन आहे. हा उपक्रम गावशिवारातील पर्यावरणीय धोरणांची दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

हा उपक्रम एका गावापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण सातारा जिल्ह्यात पोहोचविणार आहोत. शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या मदतीने हे नकाशे सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Geo Tagging
Amravati Water Conservation : जलसंधारणात थुगाव पिंप्रीचे अमोल लंगोटे ठरले भगीरथ

तांदुळवाडी- मंगळापूर येथील श्री कोल्हेश्वर विद्यालयाचे प्राचार्य सत्यवान शिर्के, शिक्षक शत्रुघ्न मोहिते, राणी पिसाळ आणि संस्थेचे सचिव अरुण माने यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थांनी गावशिवारातील विहीर, आड, कूपनलिकांचे सर्वेक्षण आणि जिओ टॅगिंग करण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत प्राचार्य सत्यवान शिर्के म्हणाले, की गावशिवारातील पारंपरिक जलस्रोतांची अचूक नोंद हे उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यातून दुर्लक्षित जलस्रोतांचे पुनरुज्जीवन सोपे जाणार आहे. आतापर्यंत पन्नास जलस्रोतांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे. हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर दीर्घकालीन जलसंवर्धनाचे नियोजन हा उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com