Amravati Water Conservation : जलसंधारणात थुगाव पिंप्रीचे अमोल लंगोटे ठरले भगीरथ

Water Conservation : शिवारात मोठ्या क्षेत्रावर संत्रा बाग आणि २०१८-१९ या वर्षात पडलेल्या भिषण दुष्काळामुळे जलस्रोत कोरडे पडले परिणामी बागा काढून टाकण्याचे संकट ओढावले.
Amravati Water Conservation
Amravati Water Conservationagrowon
Published on
Updated on

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati Farmers : शिवारात मोठ्या क्षेत्रावर संत्रा बाग आणि २०१८-१९ या वर्षात पडलेल्या भिषण दुष्काळामुळे जलस्रोत कोरडे पडले परिणामी बागा काढून टाकण्याचे संकट ओढावले. अशातच पिंप्री गावच्या अमोल लंगोटे यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून नदीवर बंधारे बांधले. यातून पाणी जमीनीत मुरत भुगर्भातील पातळी वाढली. या अनुभवातून आता स्वखर्चाने दरवर्षी नदीवर बंधारे घेण्यावर अमोल यांनी भर दिला आहे.

चांदूर बाजार तालुक्‍यातील थुगाव पिंप्री हा परिसर संत्रा उत्पादनासाठी ओळखला जातो. १२०० शेतकरी सभासद असलेल्या या गावातील ९० टक्‍के क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. उर्वरित १० टक्‍के क्षेत्रावर तूर, सोयाबीन यासारखे पीक घेतली जातात. उन्हाळ्यात संत्रा बागांचे अस्तित्व राखण्यासाठी बागेला पाणी देण्याची गरज भासते.

Amravati Water Conservation
Amravati Bogus Seeds : अंजनगावसूर्जीत अनधिकृत बियाणे साठा जप्त

मात्र भूगर्भातील पाणी पातळी सातत्याने खालावत असल्याने नजीकच्या काळात संत्रा बागायतदारांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. या समस्येचे समाधान मिळत नसल्याने हतबल शेतकरी बागा काढून टाकतात. २०१८-१९ मध्ये देखील शेतकऱ्यांना मोठ्या पाणी समस्येला सामोरे जावे लागले. भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली. ३०० फुटांवर पाणी असताना ८०० फुटांपर्यंत बोअरवेल घेतल्यानंतरही पाणी लागत नव्हते. अखेरीस ग्रामस्थांनी एकत्र येत यावर तोडगा काढण्यासाठी मंथन सुरू केले. त्यातून पर्णा नदीवर तेथील वाळू, दगडाचा वापर करीत बंधारा टाकत असलेले पाणी अडवीत ते जिरविण्यात यावे, असे ठरले.

लोकवर्गणीतून हे काम करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ५५ हजार रुपये जमा झाले. या निधीतून पोकलॅंडचा वापर करून बांध टाकण्यात आले. यातून बऱ्याचअंशी पाणी समस्येचे निराकरण झाल्याने दुसऱ्यावर्षी मात्र लोकवर्गणीसाठी कोणीच तयार होत नव्हते. परिणामी २०१९-२० पासून स्वतःच हा खर्च लंगोटे यांनी केला. पाच किलोमीटरवरील जसापूर, निंभोरा, पिंपळखुटा, थुगाव, शिरजगाव या भागातील जमिनीतील पाणी पातळीत वाढ दिसून येत आहे.

दुष्काळ अनुभवल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून जलसंधारण कामात सातत्य राखले आहे. सव्वा ते दीड लाख रुपयांचा यावर खर्च होतो. सप्टेंबर किंवा ऑक्‍टोबरमध्ये पाणी पातळी कमी होताच हे काम केले जाते. नदीत टोळ दगड आणि वाळू यामुळे पाण्याचा चांगला निचरा होतो.

- अमोल लंगोटे, शेतकरी, थुगाव पिंप्री, ता. चांदूरबाजार ९८९०३३१८२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com